महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त
खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक कारवाई व आरोपीस चार दिवसाची वन कोठडी
महाबळेश्वर प्रतिनिधी -दिनांक 18/04/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार वनपरिमंडळ अधिकारी श्री. सुनिल लांडगे यांनी आपल्या पथकासोबत महाबळेश्वर येथील बसस्थानक परिसरात सापळा रचून, वन्यप्राणी खवले मांजराचो शिकार करून त्याचे खवले काढून चिपळूण वरून बसने प्रवास करून महाबळेश्वर या ठिकाणी विक्रीच्या उद्देश्याने आलेला आरोपी प्रसाद तुकाराम गोसावी रा. मानपाडा डोंबिवली यांस मुद्देमालासह पकडले.
सदर प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये प्र.गु.रि.क्र. 04/2026 वनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी 18/04/2026 रोजी नोंद केला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये आरोपीकडून खवले मांजराचे 5.980 किलो इतके खवले जप्त करण्यात आले आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत खवले मांजर या वन्यप्राण्याचा अनुसूची। मध्ये समावेश आहे व सदर गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा किंवा 25000/- रुपये इतका दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. सदरचा गुन्हा आरोपीने मान्य व कबूल आहे.
सदरची कारवाई श्री. अमोल सातपुते (भा.व.से.) उपवनसंरक्षक वनविभाग सातारा, श्री. प्रदीप रौंधळ, सहा. वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, श्री. दिगंबर जाधव सहा. वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा, श्री. महादेव मोहिते, वनर्पारक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. सुनील लांडगे, वनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर, श्री. बा.भ.मराडे वनरक्षक मांघर (अति. कार्य. महाबळेश्वर), श्री. तुकाराम निकम, वनरक्षक तळदेव, कायम वनमजूर संतोष काळे, रोजंदारी मजूर विशाल जाधव, समीर उतेकर, गणेश वागदरे यांचेसमवेत पार पाडली.
दिनांक 19/04/2026 रोजी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महाबळेश्वर यांचे न्यायालयात आरोपीस हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक 23/04/2026 (4 दिवस) वनकोठडी सुनावली आहे. पुढील तपास श्री. सुनील लांडगे, वनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर करीत आहेत.
आवाहन
अवैध शिकार करणे, वन्यजीव अथवा मृगयाचिन्हांची तस्करी करणे, अशाप्रकारे कृत्य करून वनकायद्याचे उल्लंघन केल्यास 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा किवा 25000/- रुपये इतका दंड अथवा दोन्हो शिक्षा होऊ शकतात. तरो सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशी घटना कोणाच्या निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती वनविभागास कळवून वर्नावभागाला सहकार्य करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.



