नॅशनल स्पीड मॅथ्स परीक्षेत यशवंत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यालयाचा डंका
तांबवे — नॅशनल स्पीड मॅथ्स परीक्षेमध्ये वडगांव हवेली ता. कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पीड मॅथ्स परीक्षेत विद्यालयातील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थी आयुष दादासाहेब तालुगडे (राज्यात चौथा), कुमारी काव्यांजली संतोष जगताप (राज्यात बारावी), इयत्ता चौथी मधील तेजस्वीनी संतोष जगताप (राज्यात तेरावी), इयता सहावी तील साजिद अब्बास बानेवाला (राज्यात एकवीसावा), रिया विजय पाटसुपे (राज्यात एकविसावी), युवराज धनाजी थोरात (राज्यात अठ्ठावीस)इयत्ता सातवी मधील आर्या ओंकार जगताप (राज्यात आठवी), श्रेयश जगन्नाथ जगताप (राज्यात अठरावा)आदी विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उज्वल यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक पवार, नंदा कराळे,निवास पोळ, अश्विनी सांळुखे ,एम एस सकटे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे सचिव डी ए पाटील, अध्यक्ष एम व्ही चव्हाण, संचालक डॉ सुधीर जगताप, जे .के जगताप,माजी उपसरपंच राजेंद्र थोरात,जे जे जगताप, संतोष सांळुखे , माध्यमिक मुख्याध्यापिका विजया कदम, मुख्याध्यापक डी पी पवार आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.