Home » राज्य » शिक्षण » प्रा.डॉ.दशरथ सगरे ज्ञान क्षेत्रातील दीपस्तंभ

प्रा.डॉ.दशरथ सगरे ज्ञान क्षेत्रातील दीपस्तंभ

प्रा.डॉ.दशरथ सगरे ज्ञान क्षेत्रातील दीपस्तंभ

सातारा- यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.दशरथ सगरे यांच्या व्यक्तिमत्त्वात विलक्षण जादू आहे. ते ज्या क्षेत्रात प्रवेश करतात व जिथे स्पर्श करतात तेथे सोने होते. हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे. कल्पकता व दूरदृष्टीने साताऱ्यात यशोदा शिक्षण संस्थेची उभारणी करून ती नावारूपाला आणली आहे. अर्थात यासाठी त्यांनी केलेले कठोर परिश्रम बरोबरच दूरदृष्टी व नैतिकता च्या जोरावर त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. तसे ते मूळचे बार्शी ता. पानगाव या छोट्याशा गावातील पण नोकरीनिमित्त ते साताऱ्यात दाखल झाले आणि पाहता पाहता ते सातारच्या भूमीशी एकरूप झाले.

कर्मवीरांच्या ज्ञानभूमीत ज्ञानदानाच्या कार्याला सुरुवात करता करता त्यांनी स्वतःची शिक्षण संस्था उभारून खऱ्या अर्थाने समाजातील असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना गती दिली. प्राध्यापक दशरथ सगरे यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. वेळ काळ खूप खडतर होता घर प्रपंच तसेच गावाकडील शेतीची देखभाल आई-वडिलांचे संगोपन करता करता नोकरीच्या प्राप्त पगारावर संसाराचा गाडा कसा हाकायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे अनेकदा निर्माण झाला होता. यावर मात करण्यासाठी त्यांनी नोकरी करता करता अन्य व्यवसायात स्वतःला गुंतवून घेतले तसे पहिले तर तो काळ कठीण होता परंतु मनातला आत्मविश्वास फार मोठा होता. तसे पहिले तर कोणतीही प्रगती करताना आई-वडिलांची पुण्याई मुलाबाळांना मिळते हे आपल्या साधुसंतांनी व पूर्वजांनी सांगितलेले आहे.

तसंच काहीसं अनुभव प्रा. दशरथ सगरे यांच्या वाट्याला आला आहे. निष्ठा कठोर परिश्रम जिद्द या गोष्टी बऱ्याचदा असूनही यश हुलकावणी देते परंतु मनातल्या भावना शुद्ध असतील व नैतिकता अंगी असेल तर यश निश्चित मिळते हे प्रा. दशरथ सगरे यांनी खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखविले आहे. साताऱ्यात नोकरीनिमित्त आलेले प्रा. दशरथ सगरे यांनी ज्ञान विश्वाचे शिव धनुष्य हाती घेऊन सातारच्या भूमीत नोकरी करता करता ज्ञान मंदिराचे जाळे विणले.ज्ञानाने समाज समृद्ध व विकसित होतो याची जाणीव असलेल्या या नेतृत्वाने पाहता पाहता सातारच्या भूमीत केजी टू पीजी पर्यंतच्या ज्ञानविस्ताराच्या शाखा निर्माण केल्या. यासाठी खूप संघर्ष करावा लागला अनंत अडचणी उभ्या राहिल्या पण मनातली जिद्द मात्र कायम असल्याने आलेल्या संकटावर त्यांनी सहजपणे मात केली. अर्थात यासाठी आई-वडिलांचे संस्कार या ठिकाणी कामी आले. एक स्वप्न व ध्येय ठेवून वाटचाल करणाऱ्या प्रा. दशरथ सगरे यांनी खऱ्या अर्थाने आई-वडिलांचे स्वप्न हे पूर्ण करून दाखविले आहे. एकला चल रे या भूमिकेतून प्रवास करणारे प्रा दशरथ सगरे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीचा आज सातारा वासियांना अभिमान वाटत वाटतो.जीवनात धैर्य साहस तेथेच यश हे आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांची शैक्षणिक क्षेत्रात अखंडपणे वाटचाल सुरू आहे.

सातारच्या ऐतिहासिक राजधानीत ज्ञानाचे रोपटे लावून ते निष्ठेने वाढविणाऱ्या दशरथ सगरे यांनी ज्ञान क्षेत्राचा विस्तार करून नवक्रांती घडविली आहे. प्रतिकूलतेतून घेतलेली आकाश भरारी ही थक्क करणारी ठरली आहे. जिद्द व आत्मसात जोरावर त्यांनी मिळवलेले दैदीप्यमान यश हे खरोखरच कौतुकास्पद आहे. एक विचार एक ध्यास घेऊन प्रेरित झालेले प्रा. दशरथ सगरे यांनी केल्याने होत आहे आधी केलीची पाहिजे या संत रामदास स्वामी यांच्या वचनाप्रमाणे त्यांनी केलेले आचरण हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे. ज्ञानविस्तार करताना ज्ञानमंदिरे हे संस्कार व संस्कृतीने फुलली पाहिजेत यासाठी त्यांनी आपल्या संस्थेत नैतिक मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जडणघडण करण्याचे धोरण प्रत्यक्षात अमलात आणले. काळाची गरज ओळखून आधुनिक शिक्षणाची ज्ञानगंगा ही ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना बाजारपेठेतील स्पर्धात्मक युगात स्पर्धेला सामोरे जाताना ते सक्षम झाले पाहिजेत ही भूमिका घेऊन ते आपली शिक्षण संस्था चालवीत आहेत.

अर्थात ध्येयनिष्टेचे वेड लागलेली माणसेच खऱ्या अर्थाने नवा इतिहास घडवतात असाच एक नवा इतिहास सातारच्या भूमीमध्ये प्रा. दशरथ सगरे यांनी घडविला आहे. आज मागोवा घेतला असता ही संस्था दोन विद्यार्थ्यांवर सुरू केलेली असताना आज जवळपास दहा हजार प्रवेश क्षमतेपर्यंत प्रा. दशरथ सगरे यांनी नेऊन ठेवली आहे. अर्थात यासाठी त्यांना लाभलेले सहकाऱ्यांची भूमिका ही निर्णायक ठरली आहे. सातारच्या ज्ञान क्षेत्राला नवा आयाम देणाऱ्या यशोदा रुपी ज्ञानमंदिर आज ज्ञान क्षेत्रात सर्वात अग्रेसर आहे. दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणाची कास धरून वाटचाल करताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून ही संस्था वाटचाल करीत आहे. विद्यार्थ्यांना काळानुसार शिक्षण देण्यात या संस्थेने आघाडी घेतली असून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या अंगीभुत कौशल्येला संधी देणारे एक व्यासपीठ म्हणूनही समाजामध्ये यशोदा ने बाजी मारली आहे. उच्च शिक्षण विद्यार्थ्यांना देताना त्यांना तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शनचा लाभ मिळत असल्याने विद्यार्थीही गुणवत्तेत चमकत आहेत.

हे ज्ञान मंदिर फुलवण्यासाठी व वाढीसाठी प्रा. दशरथ सगरे यांना अखंडपणे मोलाचे साथ देणारे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे, कुलसचिव डॉ.गणेश सुरवसे, डॉ. रणजीत सिंह मोहिते, सौ साधनाताई सगरे, डॉ. स्वराली सगरे यांची अखंडपणे अनमोल साथ लाभत आहे. अर्थात कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यशासाठी निरपेक्ष व त्यागी वृत्तीने सेवा करणाऱ्या सहकाऱ्यांची नितांत गरज असते. तरच खऱ्या अर्थाने यशस्वी झेंडा उभारता येतो. यशोदा शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये प्रा. दशरथ सगरे यांच्या मुळेच ही संस्था अल्पकाळात नावारूपाला आली आहे. तसे पहिले तर स्पर्धात्मक युगात शिक्षण संस्था चालवणे खूप कठीण झाले आहे. परंतु अचूक नियोजन व दूरदृष्टी असेल तर अशक्य ते शक्य करता येते हे यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी करून दाखवले आहे. यशोदाच्या ज्ञान क्षेत्रातील भरारी पाहता या संस्थेचा भविष्यकाळ हा निश्चितच उज्वल राहणार आहे याची खात्री अनेकांना आहे. सातत्याने नावीन्यचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या दशरथ सगरे यांना डॉ.अजिंक्य सगरे, डॉ.गणेश सुरवसे, डॉ. रणजितसिंह मोहिते ही सोन्यासारखी व्यक्तिमत्व लाभल्याने आज स्पर्धात्मक युगात ही ते सर्व आघाडीवर यशस्वी होत आहेत. शैक्षणिक वर्ष सन २०२५- २६ व २०२६ – २७ च्या प्रवेश प्रक्रियेत या संस्थेने जिल्ह्यात बाजी मारली असून सर्वाधिक प्रवेश प्राप्त करण्याचा बहुमान या संस्थेने मिळवलेला आहे.

अर्थात यासाठी एक टीम म्हणून केलेले काम खऱ्या अर्थाने सार्थकी झाले. येथील अद्यावत सोयीसुविधा तज्ञ प्राध्यापक सुसज्ज ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र बस सेवा याचबरोबर विविध सेमिनार स्पर्धात्मक स्पर्धेला समोर जाण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन बरोबरच आदर युक्त वातावरण हे खरे यशोदा शिक्षण संस्थेच्या यशाचे गमक आहे. अर्थात यासाठी संस्थापक प्रा.दशरथ सगरे यांचे कुशल नेतृत्व कामी येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात 

पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात  सातारा : हाता-पायांना मुंग्या, झोप न लागणे, डोके दुखी, चक्कर, हालचालींचा मंदपणा, आकडी

Live Cricket