Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » रोबोटिक्स तंत्रज्ञान ठरेल आधुनिक प्रगतीचे प्रवेशद्वार-डॉ.अजिंक्य सगरे.

रोबोटिक्स तंत्रज्ञान ठरेल आधुनिक प्रगतीचे प्रवेशद्वार-डॉ.अजिंक्य सगरे.

रोबोटिक्स तंत्रज्ञान ठरेल आधुनिक प्रगतीचे प्रवेशद्वार-डॉ.अजिंक्य सगरे.

स्क्वेअर वेव. मोबाईल एप्लीकेशन व स्क्वेअर वेव आँफीसचे उत्साहात शुभारंभ.

सातारा… उद्योग विश्वातील पारंपरिक कार्यप्रणाली बदलत्या काळात कालबाह्य ठरत असून आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) व रोबोटिक्स तंत्रज्ञान हेच भविष्यात उद्योग विश्वाच्या सर्वांगीण प्रगतीचे प्रवेशद्वार ठरणार असल्याचे मत यशोदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ अजिंक्य सगरे यांनी मत व्यक्त केले. ते सातारा येथे स्क्वेअर वेव ऑटोमेशन टेक्नॉलॉजीच्या नवीन प्रोजेक्ट ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी क्युबिक्स ऑटोमेशन प्रा.लि पुणे येथील मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश जोशी गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर ,कुका रोबोटिक्स चे सुबोध पाटील ,क्युबिक्स ऑटोमेशनचे अविनाश महामुनी ,स्क्वेअर वेव चे संस्थापक संचालक तुषार इनामदार संचालक जयंत इनामदार संचालिका हर्षदा इनामदार आदी प्रमुख उपस्थित होते.  

डॉ.अजिंक्य सगरे पुढे म्हणाले की उद्योजकीय तंत्र कौशल्याने मनुष्यबळ निर्मिती ही काळाची गरज बनली आहे यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची नितांत गरज आहे. स्क्वेअर वेव ही उणीव भरून काढण्यासाठी कटिबद्ध आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. 

क्युबिक्स ऑटोमेशन चे मॅनेजिंग डायरेक्टर व ज्येष्ठ उद्योजक अविनाश जोशी म्हणाले की काळानुसार तंत्रज्ञान हे प्रगत होत आहे त्याला अनुसरून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे उद्योग विश्वात कुशल मनुष्यबळाचा अभाव जाणवतो तो दूर करण्यासाठी स्क्वेअर वेव सारख्या संस्थांनी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. 

गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की स्किल बेसड एज्युकेशन हे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरून कार्य करण्याची नितांत गरज आहे. उद्योग विश्वाला कौशल्य विकसित मनुष्यबळ प्राप्त होत नसल्याने उद्योजकांना अनेक समस्यांना सामना करावा लागतो त्यासाठी कुशल व कौशल्य विकसित मनुष्यबळ घडवणे यास प्राधान्यक्रम देणे आता काळाची गरज बनली आहे. 

स्क्वेअर वेव चे संस्थापक संचालक तुषार इनामदार म्हणाले की कौशल्य विकसित मनुष्यबळ निर्मितीचा ध्यास घेऊन स्क्वेअर वेव या संस्थेची वाटचाल सुरू आहे देशातील विविध नामांकित कंपन्यांबरोबर काम करण्याची संधी लाभत असल्याने संस्थेची प्रगती गतिमानीने होत आहे. उद्योजकांना कुशल व कौशल्य विकसित मनुष्यबळ आमच्या संस्थेकडून लाभत असल्यामुळे उद्योजकांनाही याचा मोठा लाभ होत आहे ‌

प्रास्ताविक व आभार स्क्वेअर वेव चे संस्थापक संचालक तुषार इनामदार यांनी केले. 

 उद्योग विश्वात गतिमानतेने व अचूक कार्यप्रणालीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) रोबोटिक्स तंत्रज्ञान हे उपयुक्त ठरत आहे. विशेषता कृषी . दळणवळण. अवकाश. क्षेत्राबरोबरच आरोग्य क्षेत्रात रोबोटिक तंत्रज्ञान हे विकसित होत आहे. रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित मानवी शरीरातील विविध आजारावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया होत आहेत हे तंत्रज्ञान अधिक विकसित झाल्याने भविष्यात या तंत्रज्ञानावरच आधारित मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे यासाठी आधुनिक तंत्रज्ञान हे आता प्रत्येकाने अवगत करणे गरजेचे बनले आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एम.आय.डी.सी. कोडोली, सातारा परिसरात कुंटणखान्यावर पोलीसांचा छापा, दोन पिडीत महिलांची सुटका, देहविक्रीसाठी महिलांना पुरविल्याचा आरोप कुंटणखाना चालवण्याऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

एम.आय.डी.सी. कोडोली, सातारा परिसरात कुंटणखान्यावर पोलीसांचा छापा, दोन पिडीत महिलांची सुटका, देहविक्रीसाठी महिलांना पुरविल्याचा आरोप कुंटणखाना चालवण्याऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

Live Cricket