दीपलक्ष्मी पतसंस्थेचा आज २९ वा वर्धापन दिन स्व:वास्तुत संपन्न होणार.

सातारा दि.5 (प्रतिनिधी) दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचा २९ वा वर्धापन दिन रविवार दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयत ७५९ अ,शनिवार पेठ, सातारा येथे सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर वर्धापन दिनास संस्थेचे संस्थापक -चेअरमन शिरीष चिटणीस, व्हा. चेअरमन आप्पासो शालगर, व्यवस्थापक विनायक भोसले, शाखाधिकारी लक्ष्मण कदम तसेच संचालक भगवान नारकर, लालासो बागवान, अनिल चिटणीस, प्रदीप देशपांडे, जगदीश खंडागळे, संचालिका शिल्पा चिटणीस, सुनील बल्लाळ, हणमंत खुडे, तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित राहणार आहे.
सदर वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेने श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे. तरी संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार तसेच हितचिंतकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.
दीपलक्ष्मी पतसंस्था ही शहर व परिसरात सहकारा बरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राच्या, तसेच वाचक चळवळ वाढवण्यासाठी भरघोस प्रयत्न करणारी अग्रगण्य पतसंस्था आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे ही संस्था आपले आर्थिक कार्य पार पाडत असताना शहरात स्वतःची संस्कृती ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.
सामान्य माणूस हा केंद्रबिंदू म्हणून ठेवीदार, कर्जदार, भागधारक, यांना सहकारातून हातभार मिळावा या उद्देशाने संस्थेची स्थापना संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस यांनी दिनांक ६ सप्टेंबर १९९७ रोजी केली होती. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली २९ वर्षाच्या कालावधीत केलेली प्रगती ही कौतुकास्पद आहे.
या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की मागील २९ वर्षापासून आमच्या असंख्य समाधानी ग्राहकांचा आमच्या प्रती असलेला अखंड विश्वास आणि भक्कम आर्थिक साथ यामुळे संस्थेला समाजामध्ये गुणवत्तापूर्ण अर्थ सेवेचा प्रवास अविरत अखंड करता आला आहे व यापुढेही चालू राहील.
संस्थेने समाजातील सर्व घटकाला जवळून बँकिंग ची सेवा दिली जावी यासाठी संस्थेने सातारा शहरात ७ शाखा शहराच्या विविध प्रभागात स्थापन केल्या असून शहराच्या मध्यवस्तीत शनिवार पेठ व शाहूपुरी येथे संस्थेच्या भव्य अशा स्व:वास्तु आहेत. या संस्थेमार्फत पारदर्शक व्यवहार, जलद सेवा तसेच सभासद व ठेवीदार आणि हितचिंतकांची सामाजिक बांधिलकी जपली जात आहे .
संस्थेच्या आज मितीस जवळपास ४० कोटीच्या ठेवी झाल्या आहेत. या जमा झालेल्या ठेवीतून समाजातील सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक, तसेच व्यवसाय संबंधित वाहनांसाठी जवळपास २८ कोटीची कर्जवाटप केले असून तरल ते पोटी १२ कोटीच्या ठेवी शहरातील विविध बँकांमध्ये ठेवल्या आहेत. सातारा शहरातील जनतेच्या सहकार्याने संस्था उत्तरोत्तर प्रगती करत राहील असा मानस सदर प्रसंगी त्यांनी व्यक्त केला.
दीपलक्ष्मी पतसंस्था सहकारात काम करत असताना सभासदांची आर्थिक पत सुधारण्यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील आहे. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी संस्था नवनवीन उपक्रम राबवत आहे. व समाजाला एक आर्थिक दिशा देण्याचे काम अविरत करत आहे. संस्थेने यशस्वी २९ वर्षे पूर्ण केले असून ३० व्या वर्षात पदार्पण करत आहे.



