यशवंत शिक्षण संस्थेत दहावीच्या निकालात गोटे -मुंढेच्या प्रितीसंगम विद्यालयातील मुलांनी मारली बाजी.
कराड प्रतिनिधीःमहाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचा निकालात सदाशिवगड येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या चारही शाखांनी निकालाची परंपरा कायम जपली आहे. सेमी इंग्रजी माध्यमा सर्व शाखांचा१००टक्के निकाल लागला आहे.यामध्ये प्रितिसंगम विद्यालयातील मुलांनी संस्थेत प्रथम तीन क्रमांकात बाजी मारत शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे . संस्थेचे सर्व शाळामधुन गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते हे पुन्हा एकदा अधोरेखित केले. यामध्ये कु.समृद्धी पवार हिने ९२.८० टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तर कु.प्रेरणा पवार ८६.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व उमराण शेख याने८६.२०टक्के मिळवून गुण तृतीय क्रमांक पटकावला आहे.प्रितिसंगम विद्यालयाचा शेकडा निकाल ९०टक्के लागला आहे.प्रितिसंगम विद्यालयाने संस्थेत पहिले तीन क्रमांक पटकावलेआहेत.
वडगांव हवेली ता. कराड येथील माध्यमिक विद्यालयाचा शेकडा निकाल ९४.४०टक्के लागला आहे. यामध्ये कु.रुपाली बावधने हिने८६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला,कु.वेदांतिका जाधव हिने ७९टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कु.प्रांजल देवकुळे हिने ७४.८०टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सदाशिवगड(हजारमाची) ता कराड येथील माध्यमिक विद्यालयाचा शेकडा निकाल ८६ टक्के लागला आहे.प्रथम क्रमांक कु.आकांक्षा व्हावळ८५.६०टक्के, द्वितीय क्रमांक आदिती नावडकर – ७६.६०टक्के व तृतीय क्रमांक सारिका मोहीते- ७६टक्के हिने पटकावला आहे.
सुर्ली माध्यमिक विद्यालयाचा शेकडा निकाल ८८.२३टक्के लागला आहे.यामध्ये प्रथम क्रमांक कु.श्रावणी खंडागळे व वेदांतिका मोरे ८०.४०टक्के गुण मिळवला, द्वितीय क्रमांक अजय वेताळ ७९.८०टक्के गुण मिळवून मिळवला व तृतीय क्रमांक कु.सायली भिसे व इशा मोहिते यांनी ७४.८०टक्के गुण मिळवून मिळवला.
संस्थेतील सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे अभिनंदन व सत्कार संस्था सचिव डी. ए .पाटील सर, स़स्थाअध्यक्ष एम. व्ही. चव्हाण सर , संचालक पी. टी. चव्हाण, राजेंद्र काटवटे,जे .के. जगताप , डॉ.सुधिर जगताप, प्रदीप वेताळ, हणमंत मोरे, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, शालेय पोषण आहार अधिक्षक विजय परीट ,शिक्षण विस्तार अधिकारी नितिन जगताप, निवास पवार,मुख्याध्यापिका मनिषा पानवळ,कमल साठे,प्रभारी मुख्याध्यापक मनोहर चव्हाण, आनंद पाटील,एन. पी. पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक दिपक पवार, माजी मुख्याध्यापक अण्णासो मोरे,जी.बी.देशमाने व सर्व शाखांमधील शालेय व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी,
सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, समस्त पालकांनी अभिनंदन केले.
