Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कष्ट, त्याग आणि संस्कारांची श्रीमंती जपणारे अरुण टक्के आज ७४ व्या वर्षात

कष्ट, त्याग आणि संस्कारांची श्रीमंती जपणारे अरुण टक्के आज ७४ व्या वर्षात

कष्ट, त्याग आणि संस्कारांची श्रीमंती जपणारे अरुण टक्के आज ७४ व्या वर्षात

भिलार प्रतिनिधी -अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत आपल्या कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या बळावर आयुष्य उभे करणारे अरुण अनंत टक्के आज आपल्या जीवनातील ७४ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाकडे पाहिले, तर प्रत्येक क्षणी मेहनत, त्याग आणि कुटुंबासाठी झटणाऱ्या एका सामान्य माणसाची असामान्य कहाणी समोर येते.

अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेल्या अरुण टक्के यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात अनेक कठीण प्रसंग अनुभवले. परिस्थिती इतकी बिकट होती की कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतेही काम कमी नाही, या भावनेतून त्यांनी महाबळेश्वर दूध डेरी येथे मदतनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पहाटेपासून रात्रीपर्यंत कष्ट करत त्यांनी संसाराचा गाडा ओढला.

मात्र, परिस्थितीसमोर कधीही हार न मानता त्यांनी आपल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर पुढे वाटचाल सुरू ठेवली. त्यांच्या मेहनतीचे चीज झाले आणि पुढे त्यांना आरटीओ विभागात नोकरीची संधी मिळाली. साध्या मदतनीसापासून सरकारी सेवेत पोहोचण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्ष, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा जिवंत आदर्श ठरला.

कुटुंबासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आज फळाला आले आहेत. त्यांच्या संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम त्यांच्या मुलांच्या यशात दिसून येतो. एक मुलगा इंजिनीयर म्हणून कार्यरत आहे, तर मोठे चिरंजीव सचिन टक्के हे दैनिक पुढारीमध्ये पत्रकार म्हणून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहेत. पत्रकारितेसारख्या कठीण क्षेत्रात सचिन टक्के यांनी निर्माण केलेली ओळख ही त्यांच्या वडिलांनी दिलेल्या संस्कारांची आणि संघर्षाचीच देण आहे. वडिलांच्या कष्टाची जाणीव आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन दोघेही आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत आहेत.

अरुण टक्के यांचा जीवनप्रवास हा केवळ एका व्यक्तीचा संघर्ष नाही, तर अनेक सामान्य कुटुंबांसाठी प्रेरणा देणारी कहाणी आहे. आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांचे भविष्य घडवणाऱ्या या कर्तृत्ववान वडिलांना ७४ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket