सातारा पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे बालविवाह रोखण्यात यश!
कोरेगाव -दि. 10 / 05 / 2026 रोजी कोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मा. पोलीस अधीक्षक सातारा यांना प्राप्त झाली. सदर माहितीची तात्काळ दखल घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदार, महिला व बाल विकास विभाग, तसेच स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी भेट दिली.
तपासणीअंती संबंधित मुलगी ही कायदेशीर विवाह वयापेक्षा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित पालक व नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ अंतर्गत बालविवाह हा दंडनीय गुन्हा असल्याची समज देण्यात आली. तसेच बालविवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशासनाच्या समुपदेशनानंतर संबंधित कुटुंबीयांनी विवाह थांबविण्यास सहमती दर्शवली असून नियोजित बालविवाह रोखण्यात मा.पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे सर,मा.अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली यश आले आहे.
सदर कारवाईमध्ये API राजेश माने, पोलीस हवालदार मुनीर मुल्ला, महिला पोलीस क्रांती जाधव सर्व नेमणूक अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभाग,सातारा , प्रियांका देशमुख नेमणूक भरोसा सेल,सातारा तसेच कोरेगाव पोलीस ठाण्याचे PSI जगदाळे, महिला पोलीस हवालदार पाचांगणे,पोलीस कॉन्स्टेबल अक्षय शिंदे, महिला व बाल विकास विभागाच्या सुजाता शिंदे,चाईल्ड लाईन प्रतिनिधी वैभव इंगवले तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
समाजातील नागरिकांनी बालविवाहासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस प्रशासन किंवा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
– API राजेश माने , अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभाग,सातारा.




