Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या कम्प्युटर इंजीनियरिंग विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट मध्ये दैदिप्यमान यश

यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या कम्प्युटर इंजीनियरिंग विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट मध्ये दैदिप्यमान यश

यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या कम्प्युटर इंजीनियरिंग विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट मध्ये दैदिप्यमान यश

प्रख्यात आयटी कंपन्यांत विद्यार्थ्यांची निवड

सातारा -प्रशिक्षण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांत संधी.यशोदा टेक्निकल कॅंपस, सातारा येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी २०२४-२५ शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय प्लेसमेंट यश संपादन केले आहे. विविध आयटी क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली असून, संस्थेच्या प्लेसमेंट सेलच्या प्रभावी कार्यपद्धतीमुळे हे यश शक्य झाले आहे.

कॉग्निझंट टेक्नॉलॉजी प्रा. लि.,ग्लोबल स्पेस टेक्नॉलॉजीज लि.,क्वालिटीकिओस्क टेक्नॉलॉजीज प्रा. लि.,डेक्सटरटेक टेक्नॉलॉजी लि.,ब्रॅंड्सजार,इटर्निटी एआय एन्डेव्हर्स (ओपीसी),पीएचएन टेक्नॉलॉजीज,एसीपीएल,विझडम स्प्राऊट्स, एक्सेलआर, आयटीप्रेन्युअर अभिनंदन कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट मिळाले आहे.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असताना प्लेसमेंटला अतिशय मोठे महत्त्व असते. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महाविद्यालयाकडून वेगवेगळ्या प्रकारची . प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कष्ट करणारा शिक्षक वर्ग, त्यांच्या कौशल्य विकासावरती विशेष लक्ष देणारे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट डिपार्टमेंट, आणि उद्योग जगताशी नाते निर्माण करणारे यशोदा इन्स्टिट्यूट चे उपक्रम या सर्व गोष्टींमुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांची यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना निवडण्यासाठी पसंती असल्याचे जाणवते.

या उल्लेखनीय यशामागे प्लेसमेंट कक्षाचे नियोजनबद्ध आणि समर्पित कार्य कारणीभूत ठरले आहे. मॉक इंटरव्ह्यू, अप्टिट्यूड ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल कार्यशाळा, तांत्रिक सत्रे, उद्योगतज्ज्ञांचे व्याख्यान या सर्व उपक्रमांनी विद्यार्थ्यांचे उद्योगासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यात मदत झाली.

हा यशाचा प्रवास संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे व उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे शक्य झाला असून, यशोदा टेक्निकल कॅंपस ही विश्वासार्ह प्लेसमेंटसाठी अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जात आहे.

“यशोदा टेक्निकल कॅंपसमध्ये शिक्षणाला केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून न पाहता, विद्यार्थ्यांच्या जीवनघडणीच्या प्रक्रियेचा एक भाग मानतो. तांत्रिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे कौशल्यविकास, व्यक्तिमत्त्व घडवणे आणि उद्योगसमोरील सज्जता वाढवणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्लेसमेंट विभागामार्फत आम्ही उद्योगजोडी, गेस्ट लेक्चर्स, मॉक इंटरव्ह्यू आणि स्किल डेव्हलपमेंट उपक्रम राबवतो. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मिळवणे नाही, तर उद्योग क्षेत्रात आपली ओळख निर्माण करावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, त्यांची मेहनत आणि आमचं मार्गदर्शन – हाच आमच्या यशाचं गमक आहे

प्रा.अजिंक्य सगरे, उपाध्यक्ष, यशोदा टेक्निकल कॅंपस

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 248 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket