यशोदा टेक्निकल कॅम्पस प्रयोगशील विद्यार्थी घडवण्यात अग्रेसर: राजेंद्रकुमार मोहिते
यशोदा टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ पॉलीटेक्निक, मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये राज्य स्तरीय “स्पार्क २ के २४” टेक्निकल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन आणि प्रमुख पाहुणे श्री. राजेंद्रकुमार मोहिते, माजी अध्यक्ष मॅन्युफक्चरिंग असोसिएशन,सातारा त्यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. राजेंद्रकुमार मोहिते, म्हणाले ” उद्योगधंदे आणि सर्वसामान्य जनतेची अभियांत्रिकी आणी अभियंत्यांकडूनची अपेक्षा सतत बदलत आहे . त्याचवेळी स्पर्धात्मक अभियंते निर्माण होणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच अशा स्पर्धांचे आयोजन केले आहे”.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रवीण गावडे यांनी “स्पार्क २ के २४” टेक्निकल इव्हेंटमध्ये आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सर्व सहभागी विध्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या. यशोदा टेक्निकल कॅम्पस चे सहसंचालक प्रा रणधिरसिह मोहिते, अभियांत्रिकी विभागाचे प्राचार्य डॉ विक्रम पाटील, अकॅडेमिक कोऑर्डिनेटर प्रा. रणजित खांडेकर, मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा रणजित बसुगडे उपस्थित होते. दिवसअखेर शोध निबंध स्पर्धेतील उपविजेते राजाराम देशपांडे (यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा) आणि विजेते हर्षदा जाधव व अर्शिया मुजावर (के. बी . पी. पॉलीटेक्निक, सातारा), प्रश्न मंजुषा स्पर्धेचे उपविजेते स्वप्नील हरदाडे (यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा) आणि विजेते श्रेयस निकम (के. बी. पी. पॉलीटेक्निक, सातारा), कॅड वॉर स्पर्धेचे विजेते वैष्णवी भिलारे (यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा) आणि उपविजेते तेजस फणसे (के. बी. पी. पॉलीटेक्निक, सातारा), लूडो स्पर्धेचे विजेते अनुष्का देशमुख (अरविंद गवळी पॉलीटेक्निक, सातारा) आणि उपविजेते आर्यन थोरात (अभयसिंह राजे भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि (पॉली), शेंद्रे, सातारा) विजेत्यांना पदक, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम बक्षिस स्वरूपात प्राचार्य प्रा प्रवीण गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. बक्षीस प्रदानाच्या वेळी सर्व विभागांचे विभागप्रमुख आणि स्पार्क २ के २४ या स्पर्धेचे संयोजक पर स्वप्नील पाटील उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम देशपांडे यांनी केले.