यशोदा इन्स्टिट्यूट च्या प्रा. अमृता मोहिते यांना शिवाजी विद्यापीठाची पी. एचडी
यशोदा इन्स्टिट्यूट सातारा येथील, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन शाखेतील प्रा. अमृता मोहिते यांना संशोधन कार्यासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी अर्थात पी. एचडी नुकतीच जाहीर करण्यात आली.
‘स्टडी ऑफ डिझाईन क्रॉस लेयर कम्युनिकेशन मॉडेल अँड पॉसिबल न्यू सोल्युशन फॉर द इंटरनेट ऑफ थिंग्स’ असा शोध प्रबंध त्यांनी सादर केला. शैक्षणिक क्षेत्रातील अठरा वर्षांचा सेवाकाळ त्यांनी पूर्ण केला आहे. संशोधन कार्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, कार्यकारी संचालिका सौ नम्रता सगरे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना या शोध कार्यासाठी डॉ. वाय के. कणसे यांचे मार्गदर्शन मिळाले.
संचालक डॉ. विवेककुमार रेदासनी, प्रा. डॉ. प्रवीणकुमार बडदापुरे, सहसंचालक, कुलसचिव, विभाग प्रमुख आदींनी शुभेच्छा दिल्या.