Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » यशोदा इन्स्टिट्यूट चे तंत्रशिक्षणातील प्रयोगशीलकार्य प्रेरणादायी: माजी शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत

यशोदा इन्स्टिट्यूट चे तंत्रशिक्षणातील प्रयोगशीलकार्य प्रेरणादायी: माजी शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत

यशोदा इन्स्टिट्यूट चे तंत्रशिक्षणातील प्रयोगशीलकार्य प्रेरणादायी: माजी शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत

यशोदा इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांना नुकताच राज्यस्तरीय कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल माजी शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत यांनी यशोदा संकुलास भेट देऊन प्रा. दशरथ सगरे यांचा गौरव केला. यावेळी उभयतांमध्ये विविध शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवरती प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी बोलताना दत्तात्रय सावंत यांनी यशोदा शिक्षण संस्थेच्या तंत्र आणि व्यावसायिक शिक्षणातील योगदानाबद्दल कौतुक केले. यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील उपलब्ध असणाऱ्या प्रयोगशाळा विशेष आवडल्याचे त्यांनी नमूद करताना, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अशा प्रकारच्या शिक्षण संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात असेही ते म्हणाले.

प्रा. दशरथ सगळे यांनी सत्काराला उत्तर देत असताना व्यक्त केलेल्या भावनांमध्ये ते म्हणाले की कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करत असताना संघटनेची ताकद ही अत्यंत महत्त्वाची असते. माणसाने आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवून चालले पाहिजे, . समाजाप्रती जे जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, समाजाच्या प्रगल्भ वैचारिक प्रबोधनाची जबाबदारी ही शिक्षक म्हणून सर्वाधिक आपल्या वरती असल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली. त्यांनी श्री दत्तात्रय सावंत आपल्या मैत्रीचे दाखले यावेळी दिले. तसेच त्यांच्या भावी शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी जयवंत तरडे, श्री गायकवाड, श्री साळुंखे, श्री शिरतोडे, श्री गाडे आदी अध्यापक उपस्थित होते.

 तुळशी हाराच्या अनोख्या सत्काराने प्राध्यापक सगरे भारावले…

ज्या कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेतले त्याच मामासाहेब जगदाळे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे प्रा.सगरे मामासाहेबांचे नावच्या पुरस्कारामुळे कृतकृत्य झाल्याचे तसेच पंढरपूर वरून आणलेल्या आलेल्या तुळशी हाराच्या सत्काराने भारावून गेल्याचे देखील पाहायला मिळाले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे देण्यात आले निवेदन 

Post Views: 121 जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे

Live Cricket