अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर

नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर

नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर

सातारा- चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशातील सीमावर्ती भागांमध्ये अलीकडे आलेल्या अचानक पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर परिसरात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत मिळावी यासाठी बीजिंग येथील भारतीय दूतावासाने महत्त्वाचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. 

तिबेट स्वायत्त प्रदेशातील सीमावर्ती भागात आलेल्या फ्लॅश फ्लडमुळे काही भारतीय नागरिक अडकण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीजिंग भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, चिनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कासाठी 0086 139 8999 0012 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच बीजिंग येथील भारतीय दूतावासाशी 0086 185 1428 4905 या क्रमांकावर संपर्क साधता येणार असून हा क्रमांक WhatsApp वरूनही उपलब्ध आहे.

याशिवाय, गरज भासल्यास काठमांडू येथील भारतीय दूतावासाशी +977 985 131 6807 आणि +977 970 910 7500 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. हे दोन्ही क्रमांक WhatsApp वरूनही संपर्कासाठी उपलब्ध असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे.

भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बीजिंग येथील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असून प्रभावित भारतीय नागरिकांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, तिबेट सीमावर्ती भागात असलेल्या भारतीय नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सर्व अधिकृत सूचना आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन भारतीय दूतावासाने केले आहे.

भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक :

– चिनी स्थानिक अधिकारी: 0086 139 8999 0012

– भारतीय दूतावास, बीजिंग: 0086 185 1428 4905 (WhatsApp उपलब्ध)

– भारतीय दूतावास, काठमांडू: +977 985 131 6807 / +977 970 910 7500 (दोन्ही क्रमांक WhatsApp वर उपलब्ध)

भारतीय दूतावासाने नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता उपलब्ध संपर्क क्रमांकांवर तातडीने संपर्क साधावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket