अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर

ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर

ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर

सातारा : सातारा शहराच्या ऐतिहासिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऐतिहासिक उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सातारा नगरपालिकेचे नगरसेवक श्री. पंकज चव्हाण यांनी प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे  केली होती. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या मागणीची दखल घेत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पत्राद्वारे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या विषयाचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

या पाठपुराव्याला यश आले असून, नगर विकास विभागाच्या ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत सातारा नगरपरिषदेस श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऐतिहासिक उद्यान विकसित करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हा निधी नगर विकास विभागामार्फत उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष आभार. तसेच या विकासकामासाठी सकारात्मक सहकार्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांचेही मनःपूर्वक आभार खासदार उदयनराजे भोसले यांनी मानले.

मंजूर निधीतून उद्यानाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यात येणार असून, ऐतिहासिक वारसा जपत नागरिकांसाठी सुंदर हरित परिसर, वॉकिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्यांची सुविधा आणि आवश्यक विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

सातारा शहराच्या ऐतिहासिक ओळखीला साजेसे आणि नागरिकांसाठी अधिक आकर्षक व सुविधायुक्त उद्यान उभे राहावे, हा या प्रयत्नामागील उद्देश आहे.उद्यानाच्या विकासाची मागणी माझ्याकडे मांडून सातत्याने पाठपुरावा करणारे नगरसेवक श्री. पंकज चव्हाण यांचेही अभिनंदन.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket