Home » राज्य » शिक्षण » यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये इंजिनिअरिंगच्या प्रगत आणि अद्ययावत पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सुरुवात

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये इंजिनिअरिंगच्या प्रगत आणि अद्ययावत पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सुरुवात

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये इंजिनिअरिंगच्या प्रगत आणि अद्ययावत पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सुरुवा

सायबर सिक्युरिटी, मेकेट्रोनिक्स आणि रोबोटिक्स या नवीन अभ्यासक्रमांसह, प्रवेश क्षमतेत देखील वाढ

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून नवीन पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये आता इंजिनिअरिंगच्या मेकेट्रोनिक्स इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कंप्यूटर सायन्स अँड इंजीनियरिंग इन सायबर सेक्युरिटी या पदवी स्तरावरील नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या सोबतच यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना देखील सुरुवात करण्यात आली आहे.

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये नेहमीच प्रगत आणि अध्यायावत अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले जाते याचाच भाग म्हणून इंजीनियरिंग महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन इंजीनियरिंग यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या विद्याशाखा मार्फत अभ्यासक्रम पुरवले जात आहेत..

कॉर्पोरेट क्षेत्राच्या उपलब्ध असणाऱ्या संधी आणि गरजा लक्षात घेऊन यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांनी नेहमीच नवनवीन अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. कॉर्पोरेट क्षेत्राची प्रत्येक गरज भागवणारा युवक हा यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये तयार झाला पाहिजे असा मानस त्यांचा आहे. यालाच अनुसरून यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील इंजिनिअरिंग विभागांमध्ये उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमांना वाढणारी मागणी लक्षात घेऊन काही अभ्यासक्रमांचे प्रवेशक क्षमता देखील वाढ करण्यात आली आहे.

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये उपलब्ध असणारा स्वतंत्र ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल, हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती विशेष लक्ष देतो विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांच्या कार्यकाळामध्ये सॉफ्टस्किल्स, टेक्निकल स्किल्स याची तयारी करून घेतली जाते. आणि मग अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप सोबत प्लेसमेंटच्या देखील विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात. चालू वर्षी फीन ओरॅकल, जॉन डीअर, कमिंस, फोर्स मोटर्स, पेटीएम, जीप्रो ड्राईव्ह, स्पार्क इंडस्ट्रीज, विनसॉफ्ट टेक्नॉलॉजी या आणि अशा विविध कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडले आहेत.

यशोदा इन्स्टिट्यूट ची ओळख ही अत्याधुनिक शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून देणारी शैक्षणिक संस्था अशी आहे. तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणून विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक वातावरण, उच्च शिक्षित आणि अनुभवी अध्यापक वर्ग, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि डिजिटल लायब्ररी मुळे इथल्या विद्यार्थी नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार होतो.

सध्याचे युग हे जागतिकीकरणाचं आणि माहिती तंत्रज्ञानासोबतच ऑटोमेशनचा असले कारणाने मेकेट्रॉनिकस इंजिनिअरिंग रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी या अभ्यासक्रमांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. सदरच्या अभ्यासक्रमान विषयी गीत माहिती घेण्यासाठी, यशोदा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा पाहण्यासाठी आणि प्रवेशा संदर्भात, कागदपत्रांसंदर्भात माहिती घेण्यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पस ला भेट द्यावी असे आवाहन, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉक्टर प्रवीणकुमार बडदापुरे यांनी केले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शिवेंद्रराजेंना एक नंबरचे मताधिक्य देण्याची संधी दवडू नका खा.उदयनराजे

शिवेंद्रराजेंना एक नंबरचे मताधिक्य देण्याची संधी दवडू नका खा.उदयनराजे भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )साताऱ्यातून १०० टक्के मतदान करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार   

Live Cricket