यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा.अजिंक्य सगरे यांचा आदर्श युवा पुरस्काराने पुणे येथे गौरव
जाधवर इंस्टिट्यूट पुणे येथे 31 जानेवारीला पुरस्कार वितरण सोहळा, शैक्षणिक कार्यातील नाविन्यपूर्ण बदलांची सुयोग्य दखल
यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगे यांना यंदाचा आदर्श युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदलांची आणि प्रयोगशील कर्तव्यगारीची सुयोग्य दखल म्हणून. हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पुणे येथील नामांकित जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने संपन्न होणाऱ्या आठव्या संसद परिषदेमध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
अभियंत्रिकीच्या तंत्रशिक्षणातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर सुद्धा कुटुंबातील शैक्षणिक वारसा अखंड चालू ठेवण्यासाठी सातारा सारख्या ग्रामीण भागामध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रखर प्रेरणा देणारे साताऱ्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. अजिंक्य दशरथ सगरे हे आहेत.
प्रचंड आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि पराकोटीची कृती शीलता आणि प्रगल्भ असा सकारात्मक दृष्टिकोन अशा विविध गुणांची अंगी खान असणारे अजिंक्य सगरे हे यशोदा शिक्षण संस्था आणि यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सातारा सह परिसरामध्ये व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणामध्ये नवनवीन बदल घडवून आणू पाहत आहेत. विद्यार्थ्यांना आणि पारंपारिक शैक्षणिक पद्धतीला बदलाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी तंत्रशिक्षणामधील अमुलाग्र बदल हाच एकमेव पर्याय असल्याचे ते मानतात. अल्पावधीमध्ये त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल म्हणून विविध सामाजिक शैक्षणिक संघटनांकडून त्यांना गौरविण्यात आले आहे त्यामध्ये यशवंतराव चव्हाण विचार मंच सातारा यांच्यामार्फत प्राचार्य रमणलाल शहा पुरस्कार, सकाळ माध्यम समूह तर्फे सकाळ जनरेशन नेक्स्ट अवॉर्ड , कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
शैक्षणिक क्षेत्रातील या कामगिरी सोबतच वैयक्तिक स्तरावर देखील संशोधनामध्ये विशेष रूची प्रा. अजिंक्य सगरे यांना आहे. त्यामुळे यशोदा सारख्या शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष असताना देखील स्वतःची डॉक्टरेट पूर्ण करण्याकडे आणि त्या अनुषंगाने शोधनिबंध आणि संशोधनांमध्ये लक्ष देताना ते पाहायला मिळतात. यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये अत्याधुनिक अभ्यासक्रमांसोबतच दर्जेदार प्रयोगशाळांचे निर्मितीकडे त्यांचा विशेष कल असल्याचे जाणवते. नाविन्यपूर्ण बदलांच्या या प्रयोगशील व्यक्तिमत्त्वाला 31 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
प्रा.दशरथ सगरे यांचा शैक्षणिक आणि वैचारिक वारसा अखंडपणे पुढे चालवण्याचा निर्धार
यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्राध्यापक दशरथ सगळे यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी नुकताच राज्यस्तरीय कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांचा शैक्षणिक आणि वैचारिक वारसा अखंड पुढे चालवण्याचा आपला निर्धार असल्यामुळेच त्यांच्या पाठोपाठ आपल्याला अशा प्रकारच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याची भावना प्रा.अजिंक्य सगरे यांनी बोलून दाखवली
