यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये ‘डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन’ अभ्यासक्रमास सुरुवात
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने या शैक्षणिक वर्षापासून ‘डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन’ या नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक प्रा. दशरथ सगरे यांनी दिली. बदलत्या जीवनशैलीसह वास्तुकलेचा नव्याने विचार होत आहे आणि त्यात इंटिरियर डिझाईनचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. घर, कार्यालय, व्यावसायिक जागा यांचं आंतरिक सजावट केवळ सौंदर्यपूर्ण न राहता कार्यक्षम आणि पर्यावरणपूरकही असावी लागते. यामुळे या क्षेत्रात व्यावसायिक डिझायनर्सची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. यशोदा कॉलेजने हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक आणि उद्योगाशी सुसंगत असा अभ्यासक्रम तयार केला आहे.
डिप्लोमा अभ्यासक्रमामध्ये आर्किटेक्चरल ड्रॉइंग, स्पेस प्लॅनिंग, फर्निचर डिझाईन, कलर थिअरी, लाइटिंग, मटेरियल्स आणि सस्टेनेबल डिझाईन यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा अनुभव मिळतो. आधुनिक सॉफ्टवेअर्सच्या सहाय्याने 2D व 3D डिझाईन तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. महाविद्यालयात अत्याधुनिक लॅब्स, स्टुडिओ आणि डिजिटल लर्निंग रिसोर्सेस उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना कामाच्या ठिकाणी जाणवणाऱ्या प्रत्यक्ष गरजांची जाण निर्माण होण्यासाठी इंडस्ट्री व्हिजिट्स, गेस्ट लेक्चर्स, कार्यशाळा आणि प्रोजेक्ट वर्क यांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे शिकवणारे प्राध्यापक हे अत्यंत अनुभवी आणि उद्योगजगतात कार्यरत असलेले तज्ज्ञ आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम केले असून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना नवीन दृष्टी देतो. महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमरचनेमध्ये कौशल्याभिमुखता आणि उद्योगाची गरज यांचा समतोल राखण्यात आला आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर स्वतःचा स्टुडिओ सुरू करण्यापासून, आर्किटेक्चरल फर्म्समध्ये काम करण्यापर्यंत, तसेच इंटिरियर प्रॉडक्ट डिझाईन, सेट डिझाईन, एक्सिबिशन डिझाईन अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. उद्योगातील मागणी लक्षात घेता इंटिरियर डिझाईन क्षेत्र हे रोजगारनिर्मितीच्या दृष्टिकोनातूनही अतिशय महत्त्वाचे ठरत आहे.
यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने विद्यार्थ्यांसाठी फक्त शिक्षण नव्हे तर एक सर्वांगीण व्यावसायिक अनुभव देणारे वातावरण तयार केले आहे. उत्तम अध्यापन, अद्ययावत साधनसामग्री आणि सर्जनशीलतेला चालना देणारी शैक्षणिक रचना यामुळे इथून बाहेर पडणारे विद्यार्थी निश्चितच उद्योगात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतील, असा आमचा विश्वास आहे. असे प्रतिपादन यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चे प्राचार्य आर्कि सुहास तळेकर यांनी केले तसेच डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ला भेट देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
