यशोदा च्या विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणातील प्रयोगशील संधीचे अवलोकन करावे: डॉ. दिनेश अमळनेरकर
यशोदा पॉलीटेक्निक मध्ये राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धा उत्साहात संपन्न
सातारा: यशोदा टेक्निकल कॅम्पस पॉलीटेक्नीक विभागामध्ये आयोजित राज्यस्तरीय “यशोटेकफेस्ट २के२५” या स्पर्धेत राज्यभरातील ७०० हून अधिक विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा “यशो टेकफेस्ट २के२५” या नावाने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये टेक्निकल पेपर प्रेसेंटेशन, ऑटो कॅड, कोड वार, फिक्स इट, मिनी साऊंड कॉम्पिटिशन, फिक्स इट, लुडो, फ्री फायर व शेरलॉक होल्म्स यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिनेश अमळनेरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाचा शोध, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि संस्कृतीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विजेत्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम विद्यार्थी आणि तंत्रज्ञानप्रेमींसाठी एक प्रेरणादायी मंच ठरला असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमास मुख्य पाहुणे म्हणून डॉ. दिनेश अमळनेरकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थांनी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा ज्यामुळे विद्यार्थ्यांना विकास जीवनचक्राची सखोल समज मिळेल असे सांगितले.
तसेच, यशोदा टेक्निकल कॅम्पसचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे सर यांनी बोलताना सांगितले कि अश्या प्रकारच्या स्पर्धा झाल्या पाहिजेत ज्यातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल व स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थी तयार राहतील. परीक्षक मंडळाने नाविन्य, उपयुक्तता आणि व्यावहारिकता या निकषांवर प्रकल्पांचे मूल्यमापन केले.
या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या प्रगत संकल्पनांवरील समज वाढवणे आणि त्यांच्या विकासाला चालना देणे हा होता. स्पर्धेच्या उद्घाटन सभारंभात यशोदा टेक्निकल कॅम्पसचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे सर, मुख्य पाहुणे डॉ. दिनेश अमळनेरकर, इंजिनीरिंग चे प्राचार्य डॉ. विक्रम पाटील, डॉ. प्रशांत पाटील, कुलसचिव गणेश सुरवसे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. प्रविण गावडे, अकॅडेमिक कोऑर्डिनेटर प्रा. रणजित खांडेकर, सर्व विभागाचे विभागप्रमुख, स्पर्धेचे संयोजक प्रा. स्वप्नील पाटील अणि इतर सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते. पारितोषिक वितरण सोहळ्याला पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा. प्रविण गावडे सर, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. विजेत्यांना पारितोषिके, स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम देशपांडे याने केले.
संस्थेचे संस्थापक मा. प्रा. दशरथ सगरे सर, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे सर, इंजिनीरिंग चे प्राचार्य डॉ. विक्रम पाटील, डॉ. प्रशांत पाटील, कुलसचिव गणेश सुरवसे, पॉलीटेक्नीकचे प्राचार्य प्रा. प्रविण गावडे, अकॅडेमिक कोऑर्डिनेटर प्रा. रणजित खांडेकर, स्पर्धेचे संयोजक प्रा. स्वप्नील पाटील, पॉलीटेक्नीकचे सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील उपस्थिती दाखवून कार्यक्रमाचे कौतुक केले.
यशोटेकफेस्ट २के २५ स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. दिनेश अमळनेरकर, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, इंजिनीरिंग चे प्राचार्य डॉ. विक्रम पाटील, डॉ. प्रशांत पाटील, कुलसचिव गणेश सुरवसे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. प्रविण गावडे व इतर मान्यवर
