Home » Uncategorized » क्राईम डायरी » वाई -पसरणी घाटात मोटार दरीत कोसळून अपघात; दोन गंभीर जखमी, दोघांचा मृत्यू

वाई -पसरणी घाटात मोटार दरीत कोसळून अपघात; दोन गंभीर जखमी, दोघांचा मृत्यू

वाई -पसरणी घाटात मोटार दरीत कोसळून अपघात; दोन गंभीर जखमी, दोघांचा मृत्यू

सातारा -पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात मोटार दोनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले.सातारा: पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात मोटार दोनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. सर्वजण लोणी काळभोर येथील रहिवासी आहेत.दोन दिवसांपूर्वी हे सर्वजण कोकणात फिरण्यासाठी गेले होते. महाबळेश्वर पाचगणी वाईमार्गे पुण्याला जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

 

पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर मोटार क्र( एम एच१२ क्यूटी ७७११) खोल दरीत कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने व घाट उताराचा अंदाज न झाल्याने गाडी खोल दरीत कोसळली. यामध्ये बजरंग पर्वत काळभोर,वैभव काळभोर,सौरभ जालिंदर काळभोर अक्षय मस्कु काळभोर (सर्वजण लोणी काळभोर, पुणे) हे गंभीर जखमी झाले. त्यांना वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

आज होळी पौर्णिमेच्या दिवशी हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच सिद्धनाथवाडी वाई येथील शिव सह्याद्री रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी व वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.जखमींना खोल दरीतून दोरखंडाच्या साह्याने बाहेर काढले. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने अनेक वाहने रस्त्यावरच उभी राहिली. त्यामुळे घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचीम व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी भेट दिली.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे देण्यात आले निवेदन 

Post Views: 124 जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे

Live Cricket