Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त.

वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून नियमाचे काटेकोरपणे पालन केल्यास त्यांना करमाफी निश्चित मिळते, असे प्रतिपादन राज्याचे संयुक्त आयकर आयुक्त डॉ. मनीष मेहता यांनी येथे केले.

लो.टिळक स्मारक संस्था आणि आयकर विभाग ( सवलत ) यांच्यावतीने ‘ धर्मादाय ट्रस्ट तसेच शैक्षणिक संस्था आणि आयकर कायदा ‘ या बाबतचे मार्गदर्शन व चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सनदी लेखापाल डॉ.सुरेश मेहता (पुणे) होते.

डॉ. मेहता म्हणाले, सार्वजनिक ट्रस्टचा उद्देश हा गरीबांना शिक्षण, योग, वैद्यकीय सहाय्य, पर्यावरण रक्षण, ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्याचे संरक्षण तसेच सामान्य लोकांचे जीवन सुसह्य करणारे उपक्रम असला पाहिजे. ट्रस्टच्या विश्वस्त आणि संचालकांनी संस्थेच्या घटनेतील उद्देश पूर्ती साठी निस्वार्थवृतीने आणि कर्तव्य भावनेतून कार्य करावे अशी अपेक्षा आहे. ‘ ना नफा ना तोटा ‘ या तत्वावर समाजोपयोगी उपक्रम राबवून लोकांचा विश्वास संपादन करावा. लो.टिळक स्मारक संस्थेचे सुसज्ज ग्रंथसंग्रहालय, वृत्तपत्र वाचन विभाग आणि अभ्यासिका आदी उपक्रम स्तुत्य असून त्याचा आदर्श अन्य संस्थानी घ्यावा. स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी अधिकारी झाल्यानंतर भविष्यात संस्थेच्या कार्यात योगदान द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आयकर अधिकारी नीरज निशेष यांनी चित्रफितीद्वारे धर्मादाय संस्थांचा उद्देश, त्यांची नोंदणी, हिशोब पुस्तके, ऑडिट, लेखा परीक्षण अहवाल सादर करणे याबाबत आयकर कायद्यातील तरतुदींची माहिती सोप्या शब्दात दिली. त्यांना आयकर अधिकारी देवेंद्र पाल सिंग व निरीक्षक नवीन सिंधु यांनी सहकार्य केले. 

अध्यक्षीय समारोपात डॉ.सुरेश मेहता यांनी सार्वजनिक संस्था व ट्रस्टच्या लेखापरीक्षणा बाबत कोणती दक्षता घ्यावी या विषयी सविस्तर माहिती दिली. 

संस्थेचे विश्वस्त सुनील शिंदे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, कार्यवाह भद्रेश भाटे, विवेक पटवर्धन, आनंद शेलार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.सौ तनुजा इनामदार व आदित्य चौडे यांनी सूत्र संचालन केले. श्री.भाटे यांनी आभार मानले.सौ मनीषा घैसास यांनी वंदेमातरम सादर केले. कार्यक्रमास सनदी लेखापाल मंदार काणे, डी.बी खरात, अनुपम खरात, प्रकाश डोईफोडे, स्वप्निल बचुटे, संदीप देशमाने, दिलीप चव्हाण,यशवंत लेले,ॲड.संजय बनकर, गिरीश जाधव,नंदु बागडे, योगिनी गोखले, अनुराधा कोल्हापुरे , शिवाजी कदम, विशाल कानडे, श्रीनिवास खरे यांच्यासह वाई, खंडाळा , व महाबळेश्वर तालुक्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक, कृष्णाबाई संस्थान व देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

आयकर आयुक्त डॉ.मनीष मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांनी महागणपती मंदिराला भेट देऊन अभिषेक केला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विश्वास गोखले व शैलेंद्र गोखले यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. तसेच प्रज्ञापाठशाळा मंडळाला भेट दिली. यावेळी सहसचिव भालचंद्र मोने यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी व ऐतिहासिक दस्तऐवजाची माहिती दिली.  

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Post Views: 50 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद महाबळेश्वर:महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक

Live Cricket