Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » वाई बस स्थानकासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण गंभीर

वाई बस स्थानकासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण गंभीर

वाई बस स्थानकासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण गंभीर

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)-वाई बस स्थानकासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. महाबळेश्वर कडून वाई कडे येणाऱ्या गाडी क्रमांक (एम एच ०४ जीई ६६९५) या गाडीने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या पादचाऱ्यांना धडक दिली.

या अपघातात राजेंद्र बजरंग मोहिते ( सोळशी, ता कोरेगाव) यांचा जागी मृत्यू झाला. अक्षय नामदेव कदम व अविनाश केळगणे (वारोशी, ता महाबळेश्वर) सिताराम धायगुडे (वाई) व शिवांश जालिंदर शिंगटे(राऊतवाडी ता कोरेगाव)हा साडेतीन वर्षांचा) हे गंभीर जखमी झाले. जखमीना वाई व सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. हे सर्वजण वाई बाजारामधून आपली कामे उरकून आपापल्या घरी चाललेले असताना सायंकाळी साडेचार च्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघाताने बस स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक व आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी भरधाव वाहन अडवून चालकाला चोप दिला. गाडीतील तीन जण पळून गेले.

हसन जिन्नससाहेब बोरवी (कोरची ता हातकणंगले,कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती परिक्षाविधीन पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली. उपनिरीक्षक बिपिन चव्हाण तपास करत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket