Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाईतील झोपडपट्टी न्यायालयाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली.

वाईतील झोपडपट्टी न्यायालयाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात  हटवण्यात आली.

वाईतील झोपडपट्टी न्यायालयाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात  हटवण्यात आली.

सातारा : यशवंतनगर वाई हद्दीतील झोपडपट्टी न्यायालयाच्या आदेशानुसार मोठ्या पोलीस बंदोबस्तात मंगळवारी हटविण्यात आली. यामुळे हा सर्व पूर्ण परिसर मोकळा झाला.वाई शहराच्या मध्यवस्तीत असणारी वाई सातारा व वाई पुणे या राज्यमार्गालगत खासगी जागेत वसलेली ही झोपडपट्टी होती. या जागेत अतिक्रमण करत पक्की घरे बांधून मोठे अतिक्रमण केले होते. त्यांना राजकीय संरक्षण मिळाल्यामुळे ही जागा रिकामी होण्यास वेळ लागला होता. न्यायालयाने याबाबत पाच वर्षांपूर्वी निर्णय दिला होता. राजकीय दबावातून कारवाईस उशीर होत होता.१९८५ सालच्या दरम्यान बावधन नाका परिसरात असणारी ही झोपडपट्टी लागलेल्या आगीत जळाली होती. यावेळी या जागेचे तत्कालीन मालक पोपटलाल व माणिकशेठ ओसवाल यांनी संबंधितांना मदत करत आधार दिला होता. यावेळी परिसरात सात ते आठ झोपड्या होत्या. संबंधितांनी विनंती केल्यामुळे ते या जागेत राहत होते.

जागा मालकांनी न्यायालयात दावा दाखल करून पाच वर्षांपूर्वी त्याचाही निकाल लागला होता. तरीही राजकीय वरदहस्त असल्याने पाच वर्षांपासून जागा मालकांना जागा खाली करून मिळत नव्हती. शेवटी जागा मालक दीपक ओसवाल यांनी संबंधितांना सोमजाई नगर परिसरात प्रत्येकी अर्धा गुंठा जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर येथील सर्व लोकांनी त्याजागी स्थलांतरित होत ही जागा स्वतःहून खाली केली. जागेवरील सर्व साहित्य व्यवस्थितरीत्या बाहेर काढण्यात आल्यानंतर सर्वांची घरे पाडण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 78 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket