वडगांव हवेली येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक शाळेत नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण
तांबवे – उन्हाळ्यासाठी नंतर आज पासून प्राथमिक व माध्यमिक शाळांची शाळा सुरू झाल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. वडगांव हवेली ता कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज शनिवार शाळेचा पहिला दिवस नवीन विद्यार्थ्यांचे फुले, गुच्छ व औक्षण करून स्वागत करण्यात आले.तसेच पहिली मध्ये नवीन दाखल झालेले विद्यार्थ्यांची वाद्य सह मिरवणूक काढण्यात आली.त्यांना मिठाईवाटप केली. तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप संस्थेचे सचिव डी ए पाटील , संचालक जे के जगताप ,माजी उपसरपंच राजेंद्र थोरात , संतोष सांळुखे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जे जे जगताप ,मनोज हुबाले,प्रशांत काटवटे, संचालक सुधीर जगताप,मुख्याध्यापक डी पी पवार , मुख्याध्यापिका विजया कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
जे जे जगताप म्हणाले या विद्यालयात नेहमी च नवं नवीन सहशालेय उपक्रम राबविले जातात.यामुळे गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत होते.यावेळी डी पी पवार शासनाच्या निर्णयानुसार सर्व शाळा आनंददायीअभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उपक्रम शाळेमध्ये राबवले जाणार असल्याचे सांगितले.आहेत विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा या दृष्टीने यावर्षी पासून दर शनिवारी दप्तरा विना शाळा हा विशेष उपक्रम राबविले जाणार आहे. यामध्ये आवांतर वाचन, गीत गायन, कविता गायन, प्रश्नमंजुषा, शाब्दिक खेळ, पाक कला ,चित्रकला, मैदानी खेळाच्या विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यात येणार असल्याचे ही सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल लोकरे यांनी स्वागत व्ही एच कदम, डी पी पवार यांनी व आभार निवास पोळ यांनी मानले. हा नवागत स्वागत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदा कराळे,मीना पाटील ,मंगल पाटील ,मंगल सकटे, अश्विनी सांळुखे, शहनाज आवटे,एम एल पाटील ,एल जे कुंभार,दादा पाटील, यांनी परिश्रम घेतले. चौकट:- इयत्ता पहिली नवीन दाखल झालेले विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल,पट्टी, पुस्तक, चित्रकला वही,रंग पेटी, मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.व विद्यार्थी साठी स्लेफी पाँइंट ही तयारकेलाहोता.विद्यार्थाचे औक्षण करून मिठाई देऊन स्वागत केले.इयता आठवी विद्यार्थी चे पेन व खाऊ वाटप करून स्वागत केले.