तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या

मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या

मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या (एसआयआर) अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्यात्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत या मतदार यादीवर हरकती-सूचना देता येणार आहेत. ज्या मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत वा मतदार यादीतून वगळली गेली आहेत त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी मिळणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदार यादीसाठी विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे वेळापत्रक नुकतेच आयोगाने जाहीर केले. त्यानुसार, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांतर्गत सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणाच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी मान्यता दिली. तसेच ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर दावे व हरकती संबंधित विधानसभा मतदारसंघ कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालयाच्या पत्त्याची यादी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mcgm.gov.in >;;>;; नवीन >;;>;; विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम – २०२६ >;;>;; दावे व हरकती >;;>;; विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालय पत्त्याची यादी या पथदर्शकान्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ज्या मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत अथवा मतदार यादीतून वगळली गेली आहेत आणि ज्यांनी दावे व हरकती दाखल केले आहेत अशा मतदारांना ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलवण्यात येणार आहे. सुनावणीद्वारे दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. तसेच ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी केली जाणार आहे.

ज्या मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत अथवा मतदार यादीतून वगळली गेली आहेत असे मतदार ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना ६ (नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना) भरून व आवश्यक ती कागदपत्रे सादर करून मतदार यादीत नावे नोंदवू शकतात.

१ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होत असलेल्यांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना ६ (नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना) भरून व आवश्यक ती कागदपत्रे सादर करून मतदार यादीत नावे नोंदवता येतील.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त (स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई) तडीपार इसमास जेरबंद करुन

Live Cricket