महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Home » राज्य » शिक्षण » उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल

उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल 

उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल 

नाशिक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर येथील प्रशासकीय इमारतीचे उदघाटन व कोनशिला अनावरण संपन्न झाले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राशी जवळपास 196 महाविद्यालये जोडली गेली असून, 32 संशोधन केंद्रे याअंतर्गत येतात. तसेच, जवळपास 3,00,000 विद्यार्थी या उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात येणार आहेत. या उपकेंद्राला कोणतेही नवीन नाव देण्यात येणार नसून, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नाशिक उपकेंद्र’ हेच याचे नाव असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाला आधुनिकतेकडे नेण्याचे काम सुरू केले आहे. त्यातील एक मैलाचा दगड म्हणून नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून काम होईल आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी झाली आहे. नाशिकचा विकास वेगाने होत असून, अशा प्रकारचे उपकेंद्र सुरू व्हावे, या महत्त्वाच्या मागणीची आज पूर्तता झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील प्रथितयश विद्यापीठांपैकी एक आहे. तसेच जागतिक मानांकनात विद्यापीठ आघाडी घेत आहे. आपल्या शिक्षण पद्धतीतून मानव संसाधन तयार झाले पाहिजे. रोजगाराच्या क्षेत्रात एआय आणि डेटा सायन्समुळे मोठे परिवर्तन होत असून, त्यानुसार नवनवीन अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाशिक जिल्ह्यात सुमारे ₹30,000 कोटींची गुंतवणूक होत असून, आगामी काळात नाशिक हे विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनेल. त्यादृष्टीने विद्यापीठांनीही नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासोबतच इन्क्युबेशन केंद्रे बनले पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. आगामी ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027’ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने या आयोजनासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचाही विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न

महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न ​महाबळेश्वर:येथील नामांकित

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket