वाईच्या आसरे येथील जगन्नाथ सणस यांचा अपघातात मृत्यू
आसरे गावावर शोककळा
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आसरे तालुका वाई येथील ग्रामपंचायती मध्ये उप सरपंच असणार्या संगीता जगन्नाथ सणस यांचे पती जगन्नाथ सखाराम सणस यांच्या दुचाकीचा झालेल्या भिषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने आसरे गावावर शोककळा पसरली आहे .तर ग्रामपंचायतीचे शिपाई असलेले साहेबराव सणस हे गंभीर जखमी झाले आहेत .हे दोघेही ग्रामपंचायतीच्या कामा निमित्त वाईला जात असताना हा भिषण अपघात मेणवली येथील रस्त्यावर असणार्या निसर्ग स्पर्श या बंगल्या समोर झाला आहे .
या गंभीर अपघाताची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना समजताच त्यांनी तातडीने हवलदार श्रिनिवास बिराजदार आणी प्रेमजीत शिर्के या दोघांना घटना स्थळावर पाठवले . वरील पोलिसांनी अपघातात मयत झालेले जगन्नाथ सणस यांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करून तो शवविच्छेदना साठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे .
