वाई पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू भोरु मेमाणे वय 55 यांचे अल्पशा आजाराने निधन
वाई दि २७:- वाई पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू भोरु मेमाणे वय 55 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांनी शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, पदावर तसेच काही काळ पांचगणी नगर परिषदेचे प्रशासनाधिकारी व वाई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांच्या पश्चात पुणे शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या पत्नी सुगंधा ,अविवाहित एक इंजिनियर मुलगा विशाल व एक इंजिनियर मुलगी विशाखा असा परिवार आहे. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी खिरेश्वर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.