Home » ठळक बातम्या » स्पोर्ट्स » विनोद कांबळीच्या मदतीला गावस्कर धावले

विनोद कांबळीच्या मदतीला गावस्कर धावले

विनोद कांबळीच्या मदतीला गावस्कर धावले, प्रत्येक महिन्याला आयुष्यभर देणार इतकी रक्कम

आजारपणामुळे खंगलेल्या आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या विनोद कांबळीसाठी खुद्द लिटल मास्टर सुनील गावस्कर धावून आले आहेत. सुनील गावस्कर यांच्या चॅम्पस फाऊंडेशनच्यावतीने कांबळीला मदत केली जाणार आहे.

गावस्कर यांची ही संस्था कांबळीला प्रत्येक महिन्याला 30000 रुपये देणार आहे. विशेष म्हणजे कांबळीला आयुष्यभर ही रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम त्याला घर खर्चासाठी दिली जाणार आहे. तसेच त्याचा वैद्यकीय खर्चासाठी वर्षाला आणखी 30000 रुपये दिले जाणार आहेत. वैद्यकीय खर्चाची रक्कमही आयुष्यभरासाठी दिली जाणार आहे. म्हणजे कांबळीला आयुष्यभरासाठी ही मोठी मदत होणार आहे. सुनील गावस्कर यांच्या चॅम्पस फाऊंडेशनची सुरुवात 1999मध्ये झाली होती. गरजवंत क्रिकेटपटूंना मदत करणे हा या फाऊंडेशनचा हेतू होता.

विनोद कांबळीला दर महिन्याला 30 हजार रुपये देण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासूनच ते दिले जाणार आहेत. म्हणजे पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही रक्कम दिली जाणार आहे. 53 वर्षीय विनोद कांबळी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्य्तं त्याला हे पैसे देण्यात येणार आहेत. 

 

*जानेवारीत भेट, एप्रिलमध्ये मदत*

 

11 जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विनोद कांबळी आणि सुनील गावस्कर यांची भेट झाली होती. यावेळी कांबळीने गावस्कर यांच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं होतं. त्यावेळी कांबळी अत्यंत भावूक झाला होता. त्या भेटीनंतर आता गावस्कर यांच्या संस्थेने हा मोठा निर्णय घेतला आहे. अवघ्या तीन महिन्यातच हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विनोद कांबळीची प्रकृती खूपच खालावली होती. त्याला यूरिन इन्फेक्शन झालं होतं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कांबळीची तब्येत बिघडल्याचं ऐकल्यानंतर गावस्कर यांनी त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 79 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket