Home » Uncategorized » क्राईम डायरी » विनापरवाना वाहतूक करणाऱ्यास वनविभागने केली अटक

विनापरवाना वाहतूक करणाऱ्यास वनविभागने केली अटक

विनापरवाना वाहतूक करणाऱ्यास वनविभागने केली अटक

साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)शुक्रवार दि. 17 रोजी रात्री मिळालेल्या माहितीवरून कडेगाव-व्याजवाडी रस्त्यावर मौजे व्याजवाडी गावाचे हद्दीत वनाधिकारी फिरती तपासणी करीत असता आरोपी विनोद हणमंत पवार,ता.वाई टाटा कंपनीच्या वाहनातून मधुन रायवळ करंज प्रजातीचा लाकुडमाल विनापरवाना वाहतुककामी भरून नेत असताना आढळून आलेने सदर टेम्पो वनपाल भुईंज कार्यालयाचे आवारात नेवुन लावला. सदर गुन्हेकामी वनरक्षक वाई यांनी गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास चालु आहे. सदर कारवाईत एकुण साडे तीन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई मा.उपवनसंरक्षक सातारा अदिती भारद्वाज मॅडम, सहा.वनसंरक्षक सातारा प्रदिप रौंधळ साहेब यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल वाई महादेव हजारे,वनपाल वाई एस.आर.मोरे, वनरक्षक बेलमाची एच.व्ही.शिंदे,वनरक्षक वाई एस.एस.चौगुले,वनरक्षक जांभळी बी.बी.मराडे,योगेश कुंभार यांनी पार पाडली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 13 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket