शुक्रवारी वाईत पंचायत समितीची तक्रार निवारण सभा
वाई प्रतिनिधी) शुभम कोदे)ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार पंचायत समिती स्तरावरील नागरिकांच्या समस्या, तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणी व समस्यांच्या सोडवणुकीसाठी वाई पंचायत समितीच्या वतीने शुक्रवारी (ता.७) सकाळी ११ वाजता, किसन वीर सभागृहात तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सभेत पंचायत समिती अधिनस्त सर्व कार्यालयांचे खाते प्रमुख, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित राहून अडचणींचे निराकरण करणार आहेत. नागरिकांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती पातळीवरील आपल्या समस्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आपल्या लेखी अर्जांसह उपस्थित राहावे. सभेत आपल्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न केले जातील, असे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी कळविले आहे.
