Home » Uncategorized » क्राईम डायरी » वाईतील धोम डाव्या कालव्यातील पाण्यात १२ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडुन मृत्यू

वाईतील धोम डाव्या कालव्यातील पाण्यात  १२ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडुन मृत्यू

वाईतील धोम डाव्या कालव्यातील पाण्यात  १२ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडुन मृत्यू

वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांची घटना स्थळाला भेट तर दुसरा सध्या मीसींग आहे .

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि रमेश गर्जे यांनी दिलेली माहिती अशी की वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा हा खानापुर गावा शेजारून जातो या कालव्यातून वाहत असलेले पाणी पाहण्यासाठी याच गावातील अथर्व  माने वय १२ वर्ष आणी अर्णव माने वय १० वर्ष असे दोघेजण गेले होते . पायातील चपला काढून या दोघांनी. कालव्याच्या कडेला ठेवून पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतानाच अथर्व हा पाय घसरून पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. तर दुसरा अर्णव हा घाबरून पळून गेला की पाण्यात बुडाला याचा सध्या तरी अंदाज पोलिसांना लागत नसल्याने त्याची भुईंज पोलिस ठाण्यात मिसींग दाखल करण्यात आली आहे.

हि घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली याची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे यांना समजताच त्यांनी या विभागाचे बिट अंमलदार सहाय्यक फौजदार वैभव टकले यांना सोबत घेऊन घटना स्थळावर पोहचुन ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहिम सुरू केली असता घटना स्थळा पासुन अवघ्या १०० मिटर अंतरावर अथर्वचा मृतदेह सापडला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे देण्यात आले निवेदन 

Post Views: 122 जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे

Live Cricket