Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीच्या उपचारासाठी अवघ्या दोन तासांत मदत

वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीच्या उपचारासाठी अवघ्या दोन तासांत मदत

वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीच्या उपचारासाठी अवघ्या दोन तासांत मदत

मुंबई, दि. ९ :- बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरातील एका गावात रसवंतीच्या मशिनमध्ये केस अडकून गंभीर जखमी झालेल्या १६ वर्षीय मुलीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदशीलतेमुळे अवघ्या दोन तासात एक लाख रुपयांची मदत मिळाली असून वेळीच मदत मिळाल्याने मुलीच्या आईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

याविषयी अधिक माहिती देताना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले, रसवंती चालवताना या मुलीचे केस अचानक मशिनमध्ये गुंतले आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गावकरी आणि सरपंच निवृत्ती कठोरे यांनी तात्काळ मुलीला जालना येथील कलावती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने त्वरित उपचार सुरू केले. दरम्यान ‘समाजभान’ या सामाजिक संस्थेने औषधाच्या खर्चाची जबाबदारी उचलली. या घटनेची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षापर्यंत पोहोचली. मुलीच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार अवघ्या दोन तासांत एक लाख रुपयांची मदत मंजूर केली. रुग्णालयानेही उपचाराचा उर्वरित खर्च उचलला.

वडिलांच्या अकाली निधनानंतर या १६ वर्षीय मुलीने कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. अभ्यासात हुशार असलेल्या १९ वर्षीय मोठ्या बहिणीला स्पर्धा परीक्षेची तयारी आणि नऊ वर्षीय भावाला शालेय शिक्षणासाठी प्रेरणा देत ती स्वतः गावातील बसस्थानकावर रसवंतीचा व्यवसाय करत होती. आईच्या मदतीने कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या मुलीवर आलेल्या संकटाने सर्वांचे मन सुन्न झाले होते. वेळीच मिळालेल्या उपचार आणि आर्थिक मदतीमुळे तिला नवजीवन मिळाले.

डोक्याला गंभीर दुखापत आणि मेंदूवरील सूज यामुळे मुलीच्या उपचारासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या मदतीनंतर रूग्णालय प्रशासनाने उर्वरित उपचारासाठीचा खर्च माफ केला. यामुळे मुलीच्या कुटुंबावरील आर्थिक ताण कमी झाला. आमदार नारायण कुचे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने रूग्णालयात जाऊन उपचार सुरु असलेल्या मुलीची भेट घेतली. शिवाय मुलीचा पुढील संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची तयारी दर्शविली. दरम्यान ‘सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्या मुलीचे प्राण वाचले. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख, आमदार, सरपंच, सामाजिक संस्था आणि डॉक्टरांची आयुष्यभर ऋणी राहीन‘, अशी भावना मुलीच्या आईने व्यक्त केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 78 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket