यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये दोन दिवसीय करिअर मेळाव्याचे आयोजन
करिअर विषयक मार्गदर्शना सोबतच, नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार
सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरणारा दोन दिवसीय करिअर मेळावा यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, सातारा जिल्हा परिषद सातारा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण आणि यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक एक जानेवारी आणि दोन जानेवारी या रोजी होणाऱ्या मेळाव्यात तज्ञान मार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमतांचा शोध घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाणार आहे, ज्यामुळे हे विद्यार्थी स्वतःचे करिअर निवडू शकतील. करियर मेळाव्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक करियर मार्गदर्शन सत्र आणि पालकांसाठी सखोल चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी मुलाखतीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची स्वप्न साकार होण्यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये संपन्न होत असलेला सदरचा करिअर मेळावा मार्गदर्शन करणारा ठरेल असा विश्वास, जिल्हा परिषद साताऱ्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनि नागराजन, यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रा. दशरथ सगरे, डॉ. अमोल डोंबाळे, श्रीमती प्रभावती कोळेकर यांनी व्यक्त केला.
इयत्ता नववी ते बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो विद्यार्थ्यांच्या आयुष्यभराची करिअरची दिशा ठरवण्यासाठी अत्यंत सजगतेने पालकांना निर्णय घ्यावे लागतात. विद्यार्थ्यांना कोणती शाखा निवडावी, कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची प्रक्रिया कशी चालते, प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमांसाठी कोणत्या प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असते, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध असतात यासारख्या प्रश्नांची उकल होण्यासाठी अशा प्रकारचे करिअर मार्गदर्शन मिळावे अत्यंत महत्त्वाचे ठरत असतात. स्पर्धेच्या धावते जगामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील विविध प्रकारच्या कौशल्यांची आवश्यकता असते या कौशल्य विकासासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होणे आणि त्यांच्या करिअरचा मार्ग पक्का होण्यासाठी या करिअर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये पार पडत असलेल्या दोन दिवसांच्या या करिअर मार्गदर्शन मिळाव्यामध्ये कौशल्य विकासावर आधारित व्याख्यान सोबत, विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी व्हावा परीक्षांची तयारी पक्की व्हावी व्यवसाय नोकरी या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विद्यार्थी आणि पालकांना करण्यात आले आहे.