ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होण्याच्या जवळ
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी
ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होण्याच्या जवळ:त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला संसदेतही बहुमत
आपल्या समर्थकांना संबोधित केलं.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलेनियासोबत समर्थकांमध्ये पोहोचले आहेत. इथे डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. हा इतिहासातील महान राजकीय क्षण असल्याच ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प मतदारांना संबोधित करताना म्हणाले की, “आम्ही मतदारांसाठी सर्व काही ठीक करणार आहोत. हा एक राजकीय विजय आहे. असा विजय आपल्या देशाने कधी पाहिलेला नाही. 47 वा राष्ट्रपती म्हणून प्रत्येक दिवस तुमच्यासाठी लढेन. हा अमेरिकेचा शानदार विजय आहे. अमेरिका पुन्हा एकदा महान राष्ट्र बनेल” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.