आजचा जनता दरबार दिवाळीचा बंपर धमाका-आमदार मनोजदादा घोरपडे
कराड -पालीतील जनता दरबारात वैयक्तिक लाभासह 200 तक्रारीचा निपटारा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला जनता दरबार आयोजित केला जातो. पाली येथे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार कल्पना ढवळे, गट विकास अधिकारी प्रताप पाटील सुरेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबार आयोजित केला होता यामध्ये अनेक लाभार्थ्यांना हार्वेस्टर,ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, झेरॉक्स मशीन, दिव्यांगांना मोटरसायकल, महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले त्यामुळे हा जनता दरबार जनतेचे प्रश्न सोडवण्याबरोबरच दिवाळीचा बंपर धमाका जनता दरबार असल्याचे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केले.
यावेळी बोलताना मनोजदादा म्हणाले कराड उत्तर च्या जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवून मला या ठिकाणी आमदार म्हणून निवडून दिले. तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या हणबरवाडी धनगरवाडी व पाल इंदोली पाणी योजना, उंब्रज चा पारदर्शक उड्डाण पूल, याच्यासह कराड उत्तर मधील नवीन नऊ पाणी योजना करण्यात यश आले. दुर्लक्षित नागझरी, जंगलवाडी, भगतवाडी, साखरवाडी या गावांना न्याय देऊ शकलो. याचबरोबर लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच गावांतर्गत विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी उभा करता आला त्यामुळे प्रत्येक गावामध्ये कमी जास्त प्रमाणात निधी देता आला याचे समाधान वाटते. जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न जागेवरती सुटतात. लोकांच्यातील वाद कमी होऊन प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करू लागले आहे. अशा पद्धतीने काम करून लोकांना जास्तीत जास्त सुख सुविधा कशा देतील या दृष्टीने पाठपुरावा चालू आहे.
महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी तीन कोटी पन्नास लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध केले आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी 13 शेतकऱ्यांना मळणी मशीन, ट्रॅक्टर व इतर अवजारांचे वाटप केले आहे. शेतीसाठी बी बियाणे व सातबारा खाते उताराचे वाटप करण्यात आले. घरबसल्या व्यवसाय चालू करण्यासाठी दिव्यांग बांधवाना झेरॉक्स मशीन सह फिरण्यासाठी मोटरसायकल वाटप करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना दाखले काढताना होणारा त्रास कमी करण्यासाठी शाळेमध्येच सर्व दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गोपीनाथ मुंडे अपघातातील वारसांना 40 लाख रुपये देण्यात आले. याचबरोबर निराधार पेन्शन,श्रावण बाळ, संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शेंडे साहेब,अपर्णा यादव,प्रवीण पवार,बी.के.राठोड,नायकवडी मॅडम ,भोरे साहेब,कुंभार साहेब,भोपळे साहेब पाटील साहेब बाजीराव पाटील मदनभाऊ काळभोर,संगीता घाडगे सरपंच,शंकरकाका शेजवळ,रणजित पाटील,संतोष पाटील,हरीश पाटील,सुनीलनाना काळभोर,प्रशांत पाटील,महेश चंदुगडे,गणेश इंजेकर,ऋषिकेश गोरे,शिवराज पाटील,धनंजय घाडगे,गणेश खंडाईत,अरुण जगदाळे यांच्यासह सर्व विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ महिला उपस्थित होते.




