नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आव्हानांचा सामना करण्यासाठी क्षमताधिष्ठित व कौशल्याधिष्ठित शिक्षक प्रशिक्षक निर्माण होणे ही काळाची गरज – मा. डॉ. अनिल पाटील
सातारा : रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा, महाविद्यालयात दिनांक 11 आणि 12 जानेवारी 2024 या दोन दिवसाच्या कालावधीत “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : 2020 च्या संदर्भात बी.एड महाविद्यालये आणि उच्च शिक्षण महाविद्यालयामध्ये एकात्मिक शिक्षक – शिक्षण कार्यक्रम (ITEP) च्या अंमलबजावणीतील आव्हाने “या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.या परिषदेचा उदघाटन समारंभ शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पार पडला. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील सर यांनी आझाद कॉलेजचा इतिहास कॅालेजच्या निर्मितीमागील ती. कर्मवीर अण्णांची दूरदृष्टी आणि शिक्षणातील बदलांचा विविध प्रवाह याविषयी माहिती दिली .त्याचप्रमाणे बदलत्या काळाला अनुसरून शिक्षण प्रवाहामध्ये भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आव्हानांचा सामना करण्यासाठी क्षमताधिष्ठित व कौशाल्याधिष्ठित शिक्षक प्रशिक्षक निर्माण होणे ही काळाची गरज असून शिक्षणातील संधी, शिक्षणाचे खाजगीकरण, शिक्षणाचे जागतिकीकरण यामध्ये टिकणारा सक्षम विद्यार्थी घडविण्यात शिक्षक प्रशिक्षकाची भूमिका विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट केली. बदलत्या काळामध्ये टिकून राहण्यासाठी शिक्षण प्रणालीमध्ये बदल होणे आवश्यक असल्याचे सांगितले. NEP -2020 च्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्था करत असलेल्या पुढाकाराबद्दल माहिती दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक प्रशिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॅा विष्णू शिखरे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रिं. डॅा वंदना नलवडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक , अतिथींचा परिचय परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. प्रा. डॅा. धनवडे यांनी आभार मानले. परिषदेचे समन्वयक म्हणून डॅा केशव मोरे यांनी काम पाहिले.
परिषदेस महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकमधील १२५ हून अधिक संशोधकांनी संशोधन पेपर सादर करून सहभाग नोंदवला .
