Home » राज्य » शिक्षण » समृद्ध जीवन होण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी: श्रीरंग काटेकर

समृद्ध जीवन होण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी: श्रीरंग काटेकर

समृद्ध जीवन होण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी: श्रीरंग काटेकर. 

गौरीशंकर इन्स्टिट्यूट लिंब फार्मसी मध्ये जागतिक पुस्तक दिन उत्साहात संपन्न, स्पर्धेतील विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. 

लिंब: साहित्यरुपी संस्कारातून मिळणारी ऊर्जा रुपी प्रेरणा खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध घडवते. यासाठी विद्यार्थ्यांनी विविध साहित्य रुपी पुस्तकांशी मैत्री करावी. असे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले. ते लिंब ता.जि.सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अँड रिसर्च या महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते.

यावेळी प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी, डॉ.धैर्यशील घाडगे डॉ. स्फूर्ती साखरे, प्रा. रोहन खुटाळे, प्रा. माधुरी मोहिते, प्रा. गौरी इथापे, प्रबंधक निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की, विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही विविध साहित्यिकांची पुस्तके वाचण्याचा कल वाढत आहे. प्रगल्भ विचाराचे सामर्थ्य खऱ्या अर्थाने पुस्तक वाचनातून आपणाला प्राप्त होत आहे. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धेतील निकिता जाधव, शंतनू काळे, नूतन गवांदे, गीताराम गरकळ या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक व आभार ग्रंथपाल विजय निकम यांनी केले. 

: स्पर्धेच्या गतिमान युगात पुस्तक वाचनाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत आहे हे वास्तव रूप आहे परंतु खऱ्या अर्थाने जीवनात आनंद व समाधान प्राप्त करायचा असेल तर पुस्तकांशी नाते प्रत्येकाने जोडले पाहिजे. आजच्या काळाची ती गरज आहे:

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket