छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जागतिक पातळीवर प्रेरणादायी : खासदार उदयनराजे भोसले
सातारा -छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जपानच्या राजधानीत उभारला जाणार आहे. जपानच्या राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाण्याच्या प्रयत्नांमध्ये एक नवीन अध्याय सुरू होत आहे. या प्रयत्नामागे शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श जागतिक पातळीवर पोहोचवण्याची इच्छा आहे. आता हा आदर्श युक्रेनसारख्या देशांनी घ्यावा, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
भाजपचे खासदार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत राजधानी सातारा ते जपानच्या टोकियो पर्यंतच्या शिवस्वराज्य रथ यात्रेचा नुकताच शुभारंभ झाला. यावेळी खा. उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खा. उदयनराजे म्हणाले की, “शिवाजी महाराजांनी स्वत:साठी काहीही केले नाही. त्यांनी केवळ रयतेचे राज्य व त्यांच्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी सर्व काही निर्माण केले. जगात अनेक मोठे योद्धे होऊन गेले, ज्यांनी आपले राज्य वाढविण्यासाठी लढाया केल्या; पण शिवाजी महाराजांनी उपेक्षित समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली.”शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया घातला आणि राज्य कारभारात लोकांचा सहभाग व्हावा, यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या विचारांनी आज जपानसारख्या देशांना प्रेरणा देण्याची क्षमता आहे. उदयनराजे भोसले म्हणाले, “आता हा आदर्श युक्रेनसारख्या देशांनी घ्यावा, असी माझी अपेक्षा असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
