Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जीवनात मैत्रभावनेने माणसे जोडत राहूया -प्रा.विश्वजित जाधव

जीवनात मैत्रभावनेने माणसे जोडत राहूया -प्रा.विश्वजित जाधव

जीवनात मैत्रभावनेने माणसे जोडत राहूया                                     -प्रा.विश्वजित जाधव

       छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये सर्जनशील लेखन कार्यशाळा संपन्न

सातारा “ जीवनाच्या वाटेवर भेटलेल्या माणसाविषयी कृतज्ञता व्यक्त मी केली.आजी, शिक्षिका , कुंभार बाई, प्रा.बी.डी.पाटील, माझे सासरे ,चित्रलेखा माने ताई, यशवंत पाटणे, योगीराज वाघमारे,अनुराधा प्रभू देसाई ,प्रा.सुभाष वाघमारे यांच्याबद्दल मी लिहिले. कुंभार बाईंच्यापासून माझा पिंड घडला.कुंभारबाईंचे अक्षर सुरेख होते. आपुलकी होती. माझ्या जीवनात आलेले अनुभव साहित्य झाले. साहित्य निर्माण होताना निरीक्षण व अनुभव घेणे महत्वाचे असते. चारुता सागर यांनी अनेक अनुभव घेतले. वि.स.खांडेकर जसे नवोदित लेखकांना प्रस्तावना लिहून प्रोत्साहन देत तसे प्रा.डॉ. सुभाष वाघमारे हे आम्हाला प्रोत्साहन देत असतात. अशा कार्यशाळा विद्यार्थी घडवण्यासाठी आवश्यक असतात.लेखकांना भेटत रहा.चांगले कवी, रसिक व्हा, साहित्य लिहा. साहित्यामुळे मन उदात्त होते. आनंद विकत मिळत नाही. मी आठवणीच्या सावल्या लिहिल्यामुळे मला आनंद मिळाला. आठवणीच्या सावल्या हे पुस्तक मी प्रा.बी.डी.पाटील यांना अर्पण केले आहे. चांगली पुस्तके आणि चांगली माणसेच आपले जीवन घडवतात. आपण जीवनात मैत्रभावनेने माणसे जोडत राहूया’ असे विचार ललित लेखक व कवी विश्वजित जाधव यांनी व्यक्त केले. ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या‘मराठी सर्जनशील लेखन कार्यशाळेत आपल्या ‘आठवणींच्या सावल्या ‘ या ललित लेखनावर बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे होते. 

       कवी शशिकांत बडेकर यांनी‘प्रतिक ‘या कवितासंग्रहाचा जन्म कसा झाला याबाबत माहिती दिली. ‘साहित्यिक होणे हा तिसरा जन्म आहे. नव्याने जन्मत राहणे हे साहित्यिकांचे वैशिष्ट्य असते. बंधमुक्त होण्यासाठी आपण लिहित असतो. मी चित्रकार प्रथम आहे. आमच्या व्यथा याच्या कथा होतात.मला सतत शिक्षण घेण्यासाठी डॉ.आ.ह .साळुंखे यांनी प्रेरित केले. मी आज व्यक्त होतोय. मला एम.ए .मराठी करण्यास त्यांनी प्रेरित केले. मी मातृपितृ भक्त आहे. प्रश्न पडत गेले आणि मी लिहित गेलो.४९८ गुन्हा माझ्यावर दाखल करण्यात आला होता. ५ वर्षे मी दुःख सहन केले. मला हे जाणवले की आई पुन्हा पुन्हा मिळत नाही. निर्दोष सुटलो. माझ्या मुलांची आई बाप होऊन मुलांचे संगोपन केले. कोणतीही गोष्ट एक चित्ताने केली पाहिजे. माझी नितीमत्ता हीच मला तारते. मी माझ्या मनाला समाधान करण्यासाठी लिखाण करत होतो. माझा मुलगा इंडियन एयर फोर्स मध्ये स्व प्रेरणेने गेला. मी माझ्या पत्नीचा देखील सतत सन्मान केला. माझ्या मुलीच्या लग्नात माझ्या डोळ्यात पाणी उभी राहिले. माझ्या आईने माझा संसार गाडा चालवला. मी प्रेम कविता देखील मी लिहिल्या.जीवनातली मजा गेली की सजाच बाकी राहते. देवाने आपल्या प्रत्येकाला काहीतरी देणगी दिलेली असते. माझ्या मामाच्या लेखनातून सुद्धा मला प्रेरणा मिळते. माझा ‘प्रतिक हा मुलगा या जगातून निघून गेला. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी माझे दुःख ऐकून मला कवितेचा संग्रह तयार करायला प्रवृत्त केले त्यामुळे मी आता कवी म्हणून फिरू लागलो असे ते म्हणाले. 

          तुषार बोकेफोडे म्हणाले की ‘ मी कॉलेजमधला टुकार विद्यार्थी होतो. सतत गेटवर असायचो. माझे बालपण प्रतापसिंहनगरमध्ये गेले. आज चांगले शिक्षण घेऊन अनेक लोक आपली प्रगती करीत आहेत. वाचणे ,समाज निरीक्षण करणे, यातूनच साहित्यिक घडतात. साहित्य माणसाला सुखाचा अनुभव देते. ययाती,मृत्युंजय कादंबरी वाचली. चंद्या कादंबरी माझे जीवन नाही. पण सभोवताल बघून नवनिर्मिती मी केली. पण समाजातल्या सांस्कृतिक अनुभवांचे जे दर्शन आहे. खालच्या स्तरात जीवन जगणाऱ्या व्यवस्थेत राहणाऱ्या मुलाला शिक्षण घेत असताना काय अडचणी येतात ते मी या कादंबरीत दृश्यरुपात उभे केले आहे. आता इंगुळ ही दुसरी कादंबरी येत आहे. मी माझे सर एकाच विचारमंचावर असेन हे मला स्वप्नातही वाटले नव्हते. साहित्य लिहिताना एखाद्या व्यक्तीच्या मनाच्या जागी जाऊन आपण त्या स्थितीत जाऊन विचार करणे आवश्यक असते. अंबानीचा मुलगा चंद्या लिहू शकणार नाही. प्रत्येक लेखक वेगळा असतो असे ते म्हणाले. 

प्रा. डॉ. अभिमान निमसे म्हणाले ‘ तुषार बोकेफोडे,प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी माझ्या साहित्यलेखनास प्रोत्साहन दिले आहे. पूर्वी पांढरा कागद, ही कथा कशी सुचली ते त्यांनी सांगितले. आढीव ते पंढरपूर हे अंतर मी सायकलवर कॉलेज जायचो. स्वतःची स्लीपर चप्पल तुटू नये यासाठी मी कॅरेजवर चप्पल ठेवून सायकल चालवत होतो, ते अनुभव मी तुषारला सांगितले तेंव्हा कथा यातून होईल असे सांगितले ,यातूनच मला साहित्य लेखन करण्याची प्रेरणा मिळत गेली. 

प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे म्हणाले की ‘अनेक कामे आपल्याला करावी लागतात.अनेक ताण मनात घेऊन माणसे जगत असतात. असे ताण घेऊन राहू नये. कुठे तरी व्यक्त झाले पाहिजे. ताण व्यक्त करून आपण आनंद घ्यायला पाहिजे. साहित्य अशा दुःख आणि वेदना यातूनच जन्मास येते. व्यक्त व्हा. ताण मनातल्या मनात दडपून ठेवू नका. माणसाला मित्र असावेत त्यांच्या जवळ व्यक्त झाल्याने मन हलके होते.मन मोकळे झाल्याने मग बरे वाटते. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रम उद्देश सांगत लेखक परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.सुभाष वाघमारे यांनी करून दिला. मराठी विभागातील विद्यार्थी प्रथमेश बाबर ,माधवी जगदाळे, शिल्पा सुरवसे, धनश्री निंबाळकर, विद्यार्थ्यांनी ग्रंथ वाचून या साहित्यिकांना प्रश्न विचारले. तेंव्हा कवी बडेकर म्हणाले की जे टोचते त्यातूनच लेखन निर्माण होते.अवांतर वाचन करा.माणसे वाचा. माणसाशी बोलून घेतल्याने आपले अनुभव समृद्ध होतात. सामान्य माणसातील लेखक व लेखकातील सामान्य माणूस याचे दर्शन या कार्यशाळेतील लेखकांची मनोगते ऐकून कळले अशी प्रतिक्रिया उपस्थित श्रोत्यांनी दिली .या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.डॉ. विद्या नावडकर व कु.समीक्षा चव्हाण यांनी केले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. संजयकुमार सरगडे यांनी काम पाहिले . प्रा.श्रीकांत भोकरे यांनी आभार मानले. कार्यशाळेत सायकल कविता संग्रह लिहिणारे कवी आढाव,डॉ.जोशी ,श्री.बडेकर यांचेसाहित अनेक साहित्यप्रेमी विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते

आठवणींच्या सावल्या’ या ललितलेख ग्रंथाचे लेखक प्रा. विश्वजित जाधव यांचा सन्मान करताना प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे ,डावीकडून कवी शशिकांत बडेकर ,कादंबरीकार तुषार बोकेफोडे व मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मौजे अतिट येथे एसीजी केअर्स फाउंडेशन आणि इनोरा नो हाऊ फाउंडेशन व अतिट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानातून राबवला गेला एकात्मिक घनकचरा प्रकल्प

Post Views: 19 मौजे अतिट येथे एसीजी केअर्स फाउंडेशन आणि इनोरा नो हाऊ फाउंडेशन व अतिट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानातून

Live Cricket