मौजे अतिट येथे एसीजी केअर्स फाउंडेशन आणि इनोरा नो हाऊ फाउंडेशन व अतिट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानातून राबवला गेला एकात्मिक घनकचरा प्रकल्प
शिरवळ प्रतिनिधी -मौजे अतिट येथे ग्रामपंचायतच्या मागणीवरून एसीजी केअर फाउंडेशन मुंबई आणि इनोरा नो हाऊ फाउंडेशन पुणे व अतिट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानातून अतिट मध्ये 350 लाभार्थ्यांना कंपोस्ट प्लांटर देण्यात आले. यामुळे गाव स्वच्छ, सुंदर व निरोगी राहण्यास मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सरपंच सौ.रुपालीताई अंकु्श जाधव यांनीं मान्यवरांचे स्वागत केले.प्रमुख पाहुणे म्हणून सौ.अनुपमा गुंठेकर कुमारी श्रद्धा भागवत मॅडम, रवींद्र सर ,मुळीक सर, जायगुडे सर, कोरडीनेटर पूनम चव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अतिट सर्व शिक्षक वर्ग कार्यक्रमासाठी यांनी उपस्थिती दर्शवली.उत्कृष्ट कंपोस्ट प्लांटर सांभाळणाऱ्या महिलांना प्रोत्साहन म्हणून आकर्षक अशा पैठण्या बक्षीस देण्यात आल्या.
