कूपर कॉर्पोरेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेला “बँको ब्ल्यू रिबन-2024” पुरस्कार प्रदान
सातारा औद्योगिक क्षेत्रात असणा-या कूपर कॉर्पोरेशन कामगार कर्मचारी सहकारी पतसंस्थेला आपल्या उल्लेखनीय कामगिरीवद्दल सहकार क्षेत्रातील मानाचा व प्रतीष्ठेचा असा “बँको ब्ल्यू रिबन” पुरस्कार-2024 प्रदान करण्यात आला.
लोणावळा येथे दि. 30 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बँको अॅडव्हानटेज अॅन्युअल सेमीनार 2025 चा भव्यदिव्य अशा समारंभात हा पुरस्कार माजी सहकार आयुक्त मा. श्री. चंद्रकांत दळवी साहेव यांच्या हस्ते हा पुरस्कार कूपर पतसंस्थेचे सचिव श्री.दत्ताञय पोतेकर व संचालक श्री विजय चौगुले यांनी स्वीकारला.
संपूर्ण राज्यातून सहकारी बँका, राष्ट्रियकृत बँका, सहकारी पतसंस्था व नागरी पतसंस्था अशा सर्व क्षेत्रातून सहकारीतेला उर्जा देणारा असा हा मानाचा पुरस्कार सातारा एम.आय.डी.सी. मधील कूपर पतसंस्थेची उल्लेखनीय कामगीरी व सलग 27 ते 28 वर्षे कार्यरत असणारी संस्था ऑडीट वर्ग ‘अ’ तसेच भागभांडवल 10 कोटी त्याचप्रमाणे मोबाईल बँकींग, डिजिटल सेवा व कोअर बँकींग प्रमाणे कामकाजात असणारी अद्यावत सहकारीता तत्वावर आधारीत सर्व मुल्यांकन प्राप्त निकषांत बसणारी संस्था असून सलग 28 वर्षे कामगार कर्मचारी या लोकांना चांगल्या अशा सेवा सुविधा तसेच कामगारांच्या आर्थिक प्रश्नांचे निराकरण करून संस्था संपूर्ण सातारा जिल्हा व औद्योगिक क्षेत्राचा मानविंदू ठरली आहे.
नावाप्रमाणे कूपर‘ कूपर सबसे ऊपर’ असे ब्रीद वाक्याची ठरवणारी मा.फरोख कूपर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली काम करीत असते व ध्येय व उद्दिष्टांची उंच भरारी घेतली आहे आपले या सर्व कारणांमुळेच तसेच सर्व निकषांत बसून या संस्थेस मानाचा जिल्ह्यात प्रथमच पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराबद्दल कूपर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. फरोख कूपर साहेब यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. नितिन देशपांडे, उपाध्यक्ष श्री कासम मुल्ला, सचिव श्री. दत्ताञय पोतेकर व संचालक श्री अमर गीते, श्री मुकुंद महाडिक, श्री. संजय माने, श्री. सागर सुर्यवंशी, श्री. विजय चौगुले, श्री हेमंत लोखंडे, श्री प्रदिप काटकर, श्री. राजेंद्र कदम, श्री. कानिफनाथ भिसे, श्री राहुल आवडे, सौ तृप्ती जाधव तसेच संस्थेच्या व्यवस्थापक सौ. संगीता कदम यांचे अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
कूपर कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी श्री रमेश जाधव, श्री अस्लम फरास, श्री. राजेश देशपांडे तसेच कूपर कॉर्पोरेशन कामगार कर्मचारी संघटनेचे कार्यध्यक्ष श्री. संतोष थोरात, सचिव श्री अभिजित कोठावळे व प्रतीनिधी श्री जाधव, श्री इंदलकर, श्री सुर्यवंशी, श्री. कुरळेकर, श्री. धनवडे, श्री पडवळ व कामगार कर्मचारी यांच्या वतीने पतसंस्थेस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
