सातारा जिल्हा वार्षिक सब जूनियर मैदानी स्पर्धा कराड येथे
मांढरदेव प्रतिनिधी(राजगुरू कोचळे )-सातारा जिल्हा ॲम्यूचर ॲथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत वार्षिक सब जुनिअर मैदानी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड या ठिकाणी मंगळवार दिनांक 11/02/2025 रोजी घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील 8,10,12 व 14 वर्षाखालील खेळाडू सहभागी होऊ शकतात, या स्पर्धेतून पंढरपूर येथे होणाऱ्या सब जुनियर राज्य मैदानी स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे.
या स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन नाव नोंदणी करावी.खेळाडूंना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 8 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लिंक वर नाव नोंदणी करावी. त्यानंतर पाठवलेल्या एन्ट्री चा विचार केला जाणार नाही. प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक दोन क्रीडा प्रकारात भाग घेता येईल. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केले आहे.
जिल्हा सब जुनिअर मैदानी स्पर्धेसाठी प्रवेश घेण्यासाठी ची लिंक :-
https://forms.gle/hawbf5RNz4dJsD6K8
