धुकं, धबधबे अन् हिरवाई… मान्सूनमध्ये साताऱ्याची सफर ठरेल अविस्मरणीय
सातारा -सातारा : पावसाळा सुरू होताच सातारा जिल्ह्यातील डोंगररांगा, धबधबे, धरणे आणि हिरवाईने नटलेली पर्यटनस्थळे पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतात. धुक्याची चादर, कोसळणारे धबधबे आणि निसर्गाचा मनमोहक आविष्कार अनुभवण्यासाठी सातारा हा मान्सून पर्यटनासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम जिल्ह्यांपैकी एक मानला जातो.
मान्सूनमध्ये आवर्जून भेट द्यावीत अशी ठिकाणे ठोसेघर धबधबा – पावसाळ्यात दिमाखात कोसळणारा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबा. कास पठार – ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान फुलांनी बहरणारे जागतिक वारसा स्थळ. बामणोली व शिवसागर बॅकवॉटर – बोटिंग आणि शांत निसर्गाचा आनंद. तापोळा (मिनी काश्मीर) – हिरवेगार डोंगर, तलाव आणि धुक्याचे अप्रतिम दृश्य.चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प – ढगांमध्ये हरवलेला नयनरम्य परिसर.महाबळेश्वर – पाचगणी – धुक्याने वेढलेले पॉइंट्स, स्ट्रॉबेरी आणि निसर्गरम्य वातावरण. सज्जनगड – अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम. अजिंक्यतारा किल्ला – सातारा शहराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी उत्तम ठिकाण.

पर्यटकांनी पावसाळ्यात पर्यटन करताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. धबधब्यांजवळ सेल्फी काढणे, पाण्यात उतरणे किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे. हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवास करणे अधिक सुरक्षित ठरेल.




