Home » राज्य » शिक्षण » यशोदा शिक्षण संस्थेची दहावीच्या निकालाची उज्वल परंपरा यंदाही कायम 

यशोदा शिक्षण संस्थेची दहावीच्या निकालाची उज्वल परंपरा यंदाही कायम 

यशोदा शिक्षण संस्थेची दहावीच्या निकालाची उज्वल परंपरा यंदाही कायम 

साधना इंग्लिश मीडियम स्कूल, साधना माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल शंभर टक्के

 यशोदा शिक्षण संस्था संचलित सर्व शाळांनी दहावीच्या निकालाची उज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे. त्याच लागलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत यशोदा शिक्षण संस्थेच्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या शांभवी धावरे (96.20%) हिने प्रथम, समृद्धी जगदाळे (94.60%) रोहन सावंत (92.60%) द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. शाळेच्या तब्बल 53 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह प्रथम श्रेणीत यश मिळवले. तर आठ विद्यार्थी हे 90% हून अधिक गुण मिळवून यशस्वी उत्तीर्ण झाले.

साधना माध्यमिक विद्यालय या शाळेचा निकाल देखील शंभर टक्के लागला. किशोरी करपे (95.40%), आदित्य सावंत (95.20%), तर प्रेरणा पवार (94%) गुण मिळवत शाळेमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय स्थानावर येण्याची किमया केली. न्यू इंग्लिश स्कूल, नूने चा निकाल देखील 100% लागला असून येथील विद्यार्थ्यांनी देखील विशेष प्राविण्यसह प्रथम श्रेणीमध्ये येत आपल्या शाळेचे नाव गौरवीत केले.

गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सत्कार समारंभ प्रसंगी यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणाऱ्या दहावीच्या टप्प्यावर त्यांनी मिळवलेले यश हे अत्यंत कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना आगामी काळामध्ये तंत्र आणि व्यावसायिक शिक्षणामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. यशोदा शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती सोबतच व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे येथील विद्यार्थी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षणामध्ये देखील त्याच प्रकारचे सातत्य राखून यशस्वी होताना पाहता येत आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कष्ट घेणाऱ्या पालकांचे, मुख्याध्यापक आणि त्यांचे शिक्षकांचे देखील कौतुक करण्यात आले 

साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, मुख्याध्यापिका सौ धुमाळे, पालक व इतर

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर

कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )-हिंदू बहुजन सन्मान

Live Cricket