प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर संपन्न झाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्ट्स चा उदघाटन सोहळा
वाई जिमखाना आणि किसन वीर महाविद्यालय, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडारसिकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अद्ययावत सोयी-सुविधांनी सुसज्ज बॅडमिंटन कोर्ट्स चा लोकार्पण सोहळा सातारा जिल्हा बॅडमिंटन असो अध्यक्षा मा श्रीमंत छ. वृषाली राजे भोसले यांच्या शुभहस्ते, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा श्री मदनदादा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
वाई सारख्या छोट्याश्या शहरात अंतर राष्ट्रीय दर्जाचे कोर्ट उभारणे ही कौतुकाची बाब असून वाई जिमखाना व किसनवीर महाविद्यालय वाई यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प हाती घेतला व यशस्वीरीत्या पूर्ण केला याबाबत मा छ श्री वृषाली राजे भोसले यांनी विशेष कौतुक केले, व यामुळे अधिकाधिक खेळाडू घडतील व राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करतील अशी खात्री देखील व्यक्त केली. तसेच स्व प्रतापराव भाऊ भोसले यांच्या स्वप्नातील हा हॉल सुसज्ज झाला असून अयोजकानी मा श्री छ वृषाली राजे भोसले यांच्याकडे दरवर्षी स्व प्रताप भाऊंच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे याबाबत व्यक्त केलेल्या इच्छेला संमती दिली.
2014 पासून या हॉल चे काम सुरू होते आणि वाई जिमखाण्याच्या नेतृत्वामुळे केवळ हे स्वप्न आज सत्यात उतरले आहे असे वक्तव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मदनदादा भोसले यांनी याठिकाणी व्यक्त केले.
किसनवीर महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबतच त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्तगुणाना वाव देण्यासाठी कायम प्रयत्नशील असतेच, या बॅडमिंटन हॉल ची उभारणी हे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात देखील नामलौकिक मिळावा यासाठी झालेली आहे, असे वक्तव्य किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. वाई जीमखान्याचे अध्यक्ष श्री अमर कोल्हापुरे यांनी वाई जीमखान्याचे अंतर्गत सुरू होणाऱ्या या तिसऱ्या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक स्व आनंद कोल्हापुरे यांचे सशक्त व सुदृढ पिढी घडविण्याचे उद्दिष्ट या कोर्ट च्या उभारणी मुळे पुन्हा एकदा सफल झाले आहे व या कोर्ट मुळे वाई च्या क्रीडा यशात नक्कीच वाढ होणार व बॅडमिंटन खेळात दर्जेदार खेळाडू घडणार असल्याची खात्री त्यांनी याठिकाणी व्यक्त केली, सर्व वाईकर क्रीडाप्रेमी यांनी याचा नक्की लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच या उभारणी मध्ये ज्यांनी सहकार्य केले असे श्री राजे महाडिक श्री शिरीष देशपांडे, श्री अविनाश रनसिंग, श्री रणवीर गायकवाड, श्री माजगावकर, श्री मनोज कान्हेरे, श्री निलेश फणसळकर, श्री समीर पवार, श्री मनोज शिंदे, श्री गजानन जाधव, श्री सचिन चव्हाण, श्री मदन जाधव यांचेदेखील आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास वाई जिमखान्याचे उपाध्यक्ष ॲड रमेश यादव, सचिव श्री सुनील शिंदे, कोषाध्यक्ष डॉ मंगला अहीवले, संचालक श्री वैभव फुले, श्री शैलेंद्र गोखले, श्री नितीन वाघचौडे, श्री अमीर बागुल, सौ प्रीती कोल्हापुरे, श्री आनंद डूबल,श्री तुकाराम जेधे हे उपस्थित होते. रंगता बेडेकर यांनी सूत्रसंचालन तर कार्यक्रमाची सांगता सौ मनीषा घैसास यांनी वंदे मातरम् सादर करून केली.
