तेलंगणा राज्यातील फार्मा कंपनीच्या रिॲक्टरमध्ये भीषण स्फोट; आठ जणांचा मृत्यू, 26 जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील एका औषधनिर्माण कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून 26 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हैद्राबाद: तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एका फार्मा कंपनीत रिॲक्टरचा भीषण स्फोट झाला आहे.
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एका फार्मा कंपनीत रिॲक्टरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 26 जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना सोमवारी (30 जून) सकाळी घडल्याची माहिती आहे.मृतांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पाशमायलाराम येथे सिगाची फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये सोमवारी सकाळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. आम्ही घटनास्थळावरून सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, तर आणखी दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
