तेजोमय फाउंडेशन सातारा संस्थेचा समर कॅम्प सांगता समारंभ उत्साहात साजरा
सातारा -सतीश बुद्धे BDO पंचायत समिती सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर,दत्तात्रय साबळे उपाध्यक्ष तेजो मय फाउंडेशन संस्था, निखिल बाबर युवा उद्योजक आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
तेजोमय संस्थेच्या माध्यमातून 15 एप्रिल ते पंधरा मे असा एक महिन्याचा तीन ते सहा वर्षातील मुलांसाठी समर कॅम्प आयोजित केला होता. या कॅम्पमध्ये गोष्ट सांगणे चित्रकला पेंटिंग ड्रॉईंग आर्ट्स अँड क्राफ्ट फन गेम्स म्युझिक अँड डान्स क्ले वर्क इंडोर गेम्स आउटडोर गेम्स ऍक्टिव्हिटी योगा मेडिटेशन पिक्चर अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या होत्या. मुलांनी अतिशय उत्साहात सर्व कृतींमध्ये त्यांचा सहभाग नोंदवला होता म्हणूनच त्यांचा आज सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शून्य ते बारा या वयामध्ये मुलांच्या मेंदूचा विकास झपाट्याने होत असतो यामध्ये आपण जर त्यांना वेगवेगळे अनुभव दिले तर त्यांचा बौद्धिक विकास चांगला होतो. नेमकी याच टप्प्यात मुलं मोबाईलच्या जास्त आहारी जातात. आणि त्यांचा मेंदूचा विकास थांबतो याचं प्रमाण सुट्टीच्या दिवसांमध्ये जास्त होतं एकदा का सवय लागली कि ती सोडन परत अवघड होऊन जातं हे होऊ नये म्हणूनच संस्थेने हा कॅम्प आयोजित केला होता. यामुळे अनेक मुलांचा मोबाईल वापरण्याचं प्रमाण कमी झालेले हे सिद्ध झालं. पालकांनी मुलांसोबत कसं वागलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्वेता घाडगे यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी खेळामधून मुलांचा विकास कसा होतो आणि खेळाच्या अजून कोण कोणत्या संधी आहेत याविषयी मार्गदर्शन केले. BDO सतीश बुद्धे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मुलांना सन्मानचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आदिती मोरे यांनी केले तसेच आभार शितल जगताप यांनी केले.
