अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » ताणतणावा पासून दूर राहण्यासाठी छंद जोपासणे आवश्यक – डॉ.सोमनाथ साबळे

ताणतणावा पासून दूर राहण्यासाठी छंद जोपासणे आवश्यक – डॉ.सोमनाथ साबळे 

ताणतणावा पासून दूर राहण्यासाठी छंद जोपासणे आवश्यक – डॉ.सोमनाथ साबळे 

सातारा, ता. १० ः गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक जीवनशैलीमुळे सर्वच आर्थिक-सामाजिक स्तरांमधील लोकांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसून येतात. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा असे अनेक आजार सर्वच वयोगटातील लोकांमध्ये वाढलेले दिसत आहेत. तणावाला तुम्ही कोणत्या प्रकारे सामोरे जाता यावरही हृदयाचं आरोग्य कसं राहील हे अवलंबून असतं. ताणतणाव वाढले तर हृदयविकार होण्याची आणि झटका येण्याची शक्यता वाढते, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गुरुवार बागेत हरी ओम ग्रुपच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक रविंद्र भारती- झुटिंग, हरी ओम ग्रुपचे अध्यक्ष शहाजी माने, उपाध्यक्ष यशवंत घोरपडे उपस्थित होते.

डॉ. साबळे म्हणाले, या जीवनशैलीविषयक आजारांमध्ये अनेक मानसिक आजार आणि मानसिक अवस्थांचाही समावेश आहे. काही वर्षांपासून जीवनशैलीविषयक आजारांत मोठी वाढ झालेली आहे. हृदयरोगाचं प्रमाण एकेकाळी ५० ते ६० वयोगटापलिकडच्या लोकांमध्ये असे मात्र आता ते हळूहळू खाली येत तरुणांमध्येही हृदयरोगाच्या धक्क्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. हृदयरोगाच्या या संकटाला वेळीच ओळखून ३०-४० वयोगटातील लोकांनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबात जर जनुकीय आजार असतील तर ते माहिती पाहिजेत. तसेच दारू-सिगारेट सोडणं अत्यंत आवश्यक आहे. 

प्रत्येक व्यक्तीने नियमित व्यायाम म्हणजे किमान 45 मिनिटं चालणं आवश्यक आहे. संतुलित आहार आणि दरवर्षी आरोग्याची तपासणी करणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताण टाळला पाहिजे. जर आहार आणि जीवनशैलीतील बदल आजपासूनच केले तर हृदयरोगाच्या संभाव्य शक्यतेला दहा ते पंधरा वर्षं पुढं ढकललं जाऊ शकतं. काही लोकांच्या बाबतीत तो पूर्णतः टाळलाही जाऊ शकतो. महिलांनीही एक चांगली जीवनशैली आत्मसात करावी आणि वेळेत चाचण्या कराव्यात, असे आवाहन डॉ. साबळे यांनी केले. यावेळी विविध ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रतिनिधींचा सत्कार डॉ. सोमनाथ साबळे यांचे हस्ते करण्यात आला.

यशवंत घोरपडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक रविंद्र भारती- झुटिंग यांनी केले. शहाजी माने यांनी आभार मानले. कार्यक्रमास दिलीप इमानदार, श्री. शेवते, रमेश ठोंबरे, सुभाष नवले, सुरेखा मोरे, विद्याताई आगाशे, शाम माळी, मदन देवी, मनीष मुनोत, चंदूशेठ जाधव, राजेंद्र जगताप, धनंजय देवी, आदी उपस्थित होते. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket