स्वराज्य फाउंडेशन’ झाली गरजु विद्यार्थ्यांचा आधार
दिनांक १३ मे २०२४ रोजी कोयना एज्युकेशन सोसायटी सभागृह,तळदेव येथे स्वराज्य फाउंडेशन च्या विद्यार्थी शैक्षणिक आधार योजना,२०२४ या उपक्रमाचा शुभारंभ विद्यार्थी,पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत साकार झाला.१०५ गाव समाजातील २७ गरजु विद्यार्थ्यांना दप्तरे,वह्या,कंपॉस,पेन संच,परिक्षा पॅड देण्यात आले व सोबतच त्यांची संपुर्ण वर्षाची सत्र फी,दोन गणवेश व सहल फी रक्कम धनादेश ते शिकत असलेल्या शाळेला सुपुर्द करण्यात आला.कार्यक्रमप्रसंगी उपस्थित इतर १६५ विद्यार्थ्यांना दप्तरे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते श्री.प्रमोदजी कारकर,श्री.लक्ष्मण दादा जाधव,झांझवड,श्री.डी.के. जाधव व किसनदादा जाधव,कोयना एज्युकेशन यांचे अद्वित्तीय मार्गदर्शन व त्यांना मन तृप्त करणारा अद्वित्तीय प्रतिसाद विद्यार्थी व उपस्थितांकडुन लाभला.या कार्यक्रमास श्री.आनंदजी पळसे,गटशिक्षणाधिकारी, हभप श्री.धोंडीराम महाराज संकपाळ,श्री.लक्ष्मण दादा जाधव,श्री.किसनदादा जाधव,श्री.डी.के.जाधव,श्री.अंकुशजी मोरे,उद्योजक,श्री.भिवाजी शेलार,श्री.चंद्रकांत जाधव,झांझवड,श्री.धोंडीबा जंगम,माजी सभापती, श्री.रहासे सर,मुख्याध्यापक इलाबेन महेता,श्री.रामचंद्र जंगम,सरपंच तळदेव,श्रीमती सुनिता चव्हाण(मोहन दाभे),श्री.हुमणे साहेब(महाड),संतोषजी सकपाळ(आहिर),श्री.धर्मेंद्र शिंदे(म्हावशी),श्री.विजय भोसले,मुख्याध्यापक,हुंबरी, श्री.नितिन कासुर्डे सर,श्री.लक्ष्मण जाधव, गुरुजी,चतुरबेट,श्री.अरुण कदम गुरुजी,श्री.किशोर जाधव,झांझवड,सुनिल जाधव,पत्रकार व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे निवेदन शब्दांची श्रीमंती लाभलेले श्री.संजय संकपाळ,गुरुजी यांनी केले.रांगोळीकार श्री.अजयजी जाधव,स्वराज्य कार्यकर्ते(निपाणी) यांची नेत्रदिपक रांगोळी खास आकर्षण ठरले तर श्री.संजयजी उतेकर,स्वराज्य कार्यकर्ते (उतेकर वानवली) यांच्या स्वच्छ सुंदर ध्वनीयंत्रणेने कार्यक्रमात बहार आणली.
फाउंडेशनच्या वतीने सोनाट,चिखली येथील झेडपी शाळेतील संपुर्ण विद्यार्थ्यांस दप्तरे व शैक्षणिक साहित्य व घावरी,वेंगळे येथील विद्यार्थ्यांस वह्या वाटप काही गावांत प्रत्यक्ष जाऊन करण्यात आले.१०५ गाव समाजसेवक,उद्योजक श्री.अंकुशजी मोरे यांच्या पंचवीसाव्या लग्नवाढदिवसाच्या औचित्याने त्यांच्या येर्णे गावाला भेट देऊन दोन्ही उभयतांच्या हस्ते १५ विद्यार्थ्यांस दप्तरे व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
अश्याप्रकारे या उपक्रमाअंतर्गत एकुण २६५ विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य लाभ देण्यास संस्था यशस्वी ठरली.
ज्यांचे विषेश सहकार्य लाभले ते,कोयना एज्युकेशन,तळदेव, समस्त शिक्षकवृंद व कर्मचारी,श्री.चंदणजी चव्हाण(मोहन दाभे),श्री.गोपिनाथ संकापाळ(वेंगळे),सौ.अमृता अनिल उतेकर,(उतेकर वानवली),श्री.धर्मेंद्र शिंदे(म्हावशी) यांचे संस्थेने विशेष आभार मानले.
कार्यक्रमासाठी स्वराज्य पुरुष/ महिला कार्यकर्त्यांची मेहनत,नियोजन,सुसुत्रता व सामाजिक बांधिलकीचे समाजातुन कौतुक होत असुन हेच खरे संस्थेचे यश आहे.
भविष्यात शैक्षणिक,आरोग्य,कृषी व सामाजिक क्षेत्रात भरघोस कार्य करण्याचा मानस ठेवुन संस्थेच्या वतीने कार्यक्रमाची सांगता झाली.