पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल 28 मे पर्यंत पोलीस कोठडी
पुणे -कल्याणीनगर अपघात प्रकरणात आधी मुलाच्या वडिलांना आणि आज मुलाच्या आजोबांना अटक करण्यात आली आहे. तसेच या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, आजोबांनी या प्रकरणात त्यांच्या कुटुंबासाठी चालक म्हणून काम करणाऱ्यावर गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकला होता, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
अमितेश कुमार म्हणाले की, पोलिसांनी आज अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक केली आहे. अल्पवयी मुलाचे आजोबा पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचे वडील आहेत. अपघाताच्या वेळी पोर्श कार तू चालवत होता असे पोलिसांना सांग. त्यासाठी त्याला पैशांची ऑफर दिली होती. तसेच चालकाने गुन्हा अंगावर घ्यावा म्हणून त्याला डांबूनही ठेवले होते, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहे.